Prakash Ambedkar Offer to Chhagan Bhujbal : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर दिली आहे. “भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आम्हाला वाटतं”, असंही आंबेडकर म्हणाले. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. तर प्रकाश आंबेडकर देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही ओबीसींसाठी लढत आहात, छगन भुजबळ देखील ओबीसींची बाजू मांडत आहेत. त्यामुळे तुम्ही छगन भुजबळ यांना तुमच्याबरोबर घेणार का? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी तर वाट पाहतोय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून (अजित पवार गट) बाहेर पडावं आणि आमच्याबरोबर यावं. भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत. पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा केवळ भुजबळच करू शकतात. यावर दुसरं कोणीही बोलू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्याबरोबर यावं”.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Winter Session Nagpur Maharashtra Assembly Opposition Leader Mahavikas Aghadi
बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीलाही वंचितबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष चालू आहे. अशातच प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची निर्मिती करू पाहत आहेत. यात त्यांनी माकपला त्यांच्याबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी मागील निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युती करून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणुकीत त्यांना फारसं यश मिळालं नाही. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकर पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा >> शिवाजी महाराजांचा ‘तो’ पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

प्रकाश आंबेडकरांची माकपलाही ऑफर

प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही माकपला तुमच्याबरोबर घेणार का? त्यावर ते म्हणाले, माकपचा त्यांच्या जोडीदाराबरोबर काडीमोड व्हायला हवा. तरच त्यांची नवी सोयरीक होईल. त्यांचा काडीमोड व्हायला हवा असं मला वाटतं. त्यांनी महाराष्ट्रात आमच्याबरोबर यावं. मी केरळ किंवा पश्चिम बंगालमधल्या माकपबद्दल बोलत नाहीये. मी महाराष्ट्रातील माकपबद्दल बोलतोय. सध्या मी त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहणार आहे. अन्यथा आम्ही त्यांच्याशी लग्न कसं करणार?

Story img Loader