Prakash Mahajan on Sada Sarvankar Mahim Assembly Constituency : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ चालू आहे. दरम्यान, या निवडणुकीत काही उमेदवारांमुळे वेगवेगळे मतदारसंघ चर्चेत आले आहेत. यापैकी एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे अमित ठाकरे हे दुसरेच ठाकरे आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका भाजपानं घेतली असताना त्यांच्या मित्रपक्षाने म्हणजेच शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी दिली असून सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज देखील भरला आहे.

दरम्यान, सदा सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. अशातच, मनसेने महायुतीसमोरचे उमेदवार मागे घेतले तर मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा विचार करेन, असं वक्तव्य आमदार सदा सरवणकर यांनी केलं आहे. त्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सरवणकरांचा हा कुठला तर्क आहे? मला काही समजलं नाही. मुळात आम्ही (मनसे) सरवणकरांना कधीच म्हणालो नाही की त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी. मनसेने कधी अशी औपचारिक विनंती देखील केलेली नाही”.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या निर्णयाचा मला आनंद, कारण…”, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया!

सदा सरवणकरांनी आता गजाननाची सेवा करावी : प्रकाश महाजन

प्रकाश महाजन म्हणाले, “सदा सरवणकर हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत असतील, आम्ही त्यांना कधीच म्हटलं नाही की तुम्ही निवडणूक लढू नका. मात्र, आम्ही लढणार आहोत हे निश्चित आहे. सध्या सदा सरवणकर यांचे दोन्ही पाय केळाच्या सालीवर आहेत. ते १५ वर्षे नगरसेवक होते, त्यानंतर १५ वर्षे ते आमदार होते. त्यानंतर त्यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आता गजाननाची सेवा करावी आणि तरुणांना राजकारणात वाव द्यावा”.

हे ही वाचा >> Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”

प्रकाश महाजन भाजपाबद्दल काय म्हणाले?

मनसे नेते महाजन म्हणाले, “अमित ठाकरे हे साधारण मनसैनिक आहेत. आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करणार, ते निवडणूक लढणार आणि जिंकणार. आमच्यासमोर कोणता उमेदवार आहे याने आम्हाला फरक पडत नाही. लढाई ही लढाई असते. भाजपा त्यांच्या महायुतीत असली तरी त्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. एका तरुणाला पुढे आणण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे”.

Story img Loader