Lok Sabha ELection Result 2024 : १८ व्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी इंडिया आघाडीने २३५ जागा जिंकून एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. निवडणुकीचा प्रचार करताना ४०० पारचा नारा देणारी एनडीए ३०० जागाही जिंकू शकली नाही. मागील दोन्ही निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचा वारू २४० जागांवर रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळालं आहे. तर काँग्रेसचे ९९ उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीने ३७, तृणमूल काँग्रेसने २९, द्रविड मुन्नेत्र कळघमने २२, तेलुगू देशम पार्टीने १६, संयुक्त जनता दलाने १२, शिवसेनेच्या ठाकरे गटाने ९, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीपूर्वी जाहीर झालेले जवळपास सर्वच एक्झिट पोल्स चुकीचे ठरले आहेत. सर्व एक्झिट पोल्समध्ये भाजपाला २८० ते ३५० जागा मिळतील, तसेच एनडीएला ३२० ते ३८० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हे सर्व पोल्स चुकीचे ठरले आहेत. दुसऱ्या बाजूला राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवलेला अंदाजही चुकीचा ठरला आहे. भाजपा २०१९ पेक्षाही यंदा अधिक चांगल्या पद्धतीने बहुमत मिळवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता, जो चुकीचा ठरला आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांनी केवळ २४० जागा जिंकल्या आहेत.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी वर्तवलेला अंदाज मात्र काही प्रमाणात बरोबर ठरला आहे. यादव म्हणाले होते की, भाजपाला जवळपास ७० जागांचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाच्या जागा या लोकसभा निवडणुकीत ३०३ वरून २३३ वर येण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाच्या एनडीएतील मित्रपक्षांना ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचं या निवडणुकीतील संख्याबळ २६८ ते २७० पर्यंत जाईल. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपाप्रणित एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला होता. महाराष्ट्रात एनडीएला २५ जागांचा फटका बसला आहे.

हे ही वाचा >> “इथे मस्ती उतरवून मिळेल”, मविआच्या लोकसभेतील यशानंतर रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रिपब्लिक भारत-मैट्रीजचा सर्वे

एनडीए – ३५३ ते ३६८ जागा
इंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागा
इतर- ४३ ते ४८ जागा

रिपब्लिक PMARQ चा अंदाज
एनडीए – ३५९ जागा
इंडिया आघाडी – १५४ जागा
इतर- ३० जागा

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज
एनडीए- ३६२ ते ३९२ जागा
इंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागा
इतर- १० ते २० जागा

इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज
एनडीए -३७१ जागा
इंडिया आघाडी- १२५ जागा
इतर – ४७ जागा

एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज
एनडीए-३५३ ते ३८३ जागा
इंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागा
इतर – ४ ते १२ जागा

चाणक्यचा सर्व्हे
एनडीए ४०० ते ४१५ जागा
इंडिया आघाडी- १०७ ते १११ जागा
इतर ३६ जागा