Pravin Darekar : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आमच्या पक्षाच्या…” भाजपाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Pravin Darekar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. भाजपाच्या जागा जास्त येत आहेत हे दिसून येतं आहे. आमच्या जवळपास १२५ जागा येतील त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असं विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 results महाराष्ट्रात २०१९ ला काय घडलं होतं?

महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले.

Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलं आहे?

“लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”

भाजपा १३१ जागांवर आघाडीवर

आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा १३१ शिंदे सेना ५५ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या ६० जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस २२, ठाकरे गट २० आणि शरद पवार गटाचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत.

एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर ११० जागांची संख्या पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pravin darekar said devendra fadnavis will be the next cm of maharashtra scj

First published on: 23-11-2024 at 10:51 IST

संबंधित बातम्या