Exit Poll 2024 Latest Updates : सार्वत्रिक निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून एक्झिट पोलही जाहीर झालेत. विविध माध्यमसंस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे अंदाज समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

“भारताने मतदान केले!”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. मतदारांचा सक्रिय सहभाग हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. यामुळे आपल्या राष्ट्रात लोकशाही असल्याचं सिद्ध झालं आहे. मला भारताच्या नारी शक्ती आणि युवा शक्तीचे विशेष कौतुक करायचे आहे. त्यांनी उत्साहाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. मी विश्वासाने सांगू शकतो की एनडीए सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी भारतातील जनतेने विक्रमी संख्येने मतदान केले आहे. आमच्या कामामुळे गरीब, उपेक्षित आणि दलितांच्या जीवनात गुणात्मक बदल घडून आला असल्याचा आमचा ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी पाहिला”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
dr sulakshana shilwant dhar
“तीच्यावर पक्षाचा फार जीव”, शिलवंत यांचं तिकीट कसं कापलं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

हेही वाचा >> Exit Poll 2024 Live Update : पंजाबमध्ये काँग्रेसची भाजपासह आपवरही सरशी; शेतकरी आंदोलनाचा भाजपाला फटका?

संधीसाधू इंडिया आघाडी अयशस्वी ठरली

“तसंच, नागरिकांनी पाहिले आहे की भारतातील सुधारणांमुळे भारताला पाचव्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्यास प्रवृत्त केले आहे. आमची प्रत्येक योजना कोणत्याही पक्षपाताशिवाय इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. संधीसाधू इंडिया आघाडी मतदारांशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरली. ते जातीवादी, जातीयवादी आणि भ्रष्ट आहेत. मूठभर राजघराण्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने असलेली ही आघाडी राष्ट्रासाठी दूरदृष्टी सादर करण्यात अयशस्वी ठरली. प्रचारात त्यांनी फक्त मोदींवर टीका केली. असे प्रतिगामी राजकारण जनतेने नाकारले आहे”, असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवरही प्रहार केला.

त्यांनी पुढे कार्यकर्त्यांचेही आभार मानले. ते म्हणाले, “मला प्रत्येक एनडीए कार्यकर्त्याचे कौतुक करायचे आहे. आमचा विकासाचा अजेंडा लोकांसमोर बारकाईने समजावून सांगितल्याबद्दल आणि त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आपले कार्यकर्ते ही आपली सर्वात मोठी ताकद आहे.”

तसंच शेवटी त्यांनी सुरक्षा दलांचेही आभार मानले. ते म्हणाले, “संपूर्ण निवडणुकांदरम्यान आपल्या अतुलनीय दक्षतेबद्दल आमच्या उत्कृष्ट सुरक्षा दलांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे लोकांना मतदान प्रक्रियेत सहजतेने भाग घेता आला आहे.”