उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज(गुरुवार) लागले. यामध्ये चार राज्यांत भाजपाला बहुमत मिळालं, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे भाजपाला मिळालेल्या यशानंतर दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयातून पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले.

या प्रसंगी गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री अमित शाह, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज उत्साहाचा, उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. मी या निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या निर्णयासाठी मतदारांचे आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या माता-भगिनींनी, आमच्या तरूणांनी ज्या प्रकारे भाजपाला भरपूर समर्थन दिलं आहे. तो खूप मोठा संदेश आहे.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने एनडीएसाठी विजयी चौकार लगावला –

तसेच, “मला याचं देखील समाधान आहे, की पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी देखील मोठ्याप्रमाणात मतदानात सहभाग घेतला आणि भाजपाचा विजय निश्चित केला. निवडणुकी दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला वचन दिलं होतं, यावेळी होळी १० मार्च पासूनच सुरू होईल. आपल्या कर्मठ कार्यकर्त्यांनी हा विजयी ध्वज फडकवून, हे वचन पूर्ण करून दाखवलं आहे. मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांची पूर्णपणे प्रशंसा करेल, ज्यांनी दिवस-रात्र न पाहता या निवडणुकीत कठोर परिश्रम केले. आपले कार्यकर्ते जनतेच मन, त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले. याचबरोबर संपूर्ण पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं, कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन केलं. असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे देखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. पक्षाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने आज एनडीएसाठी विजयी चौकार लगावला आहे.” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपाला चारही दिशेने आशार्वाद मिळाला आहे –

याचबरोबर, “उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या एखाद्या मुख्यमंत्र्याची दुसऱ्यांदा निवड होण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३७ वर्षानंतर एखादं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. तीन राज्य यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकारमध्ये असतानाही भाजपाच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे. गोव्यात सगळे एक्झिट पोल चुकीचे ठरले आणि तिथल्या जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही राज्यात भाजपाच्या जागांची संख्या वाढली आहे.उत्तराखंडमध्ये देखील भाजपाने नवा इतिहास रचला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला आहे. म्हणजेच सीमाभागाशी जुडलेले असलेले एक पर्वतीय राज्य, एक समुद्रतटीय राज्य आणि एक गंगेचा विशेष आशीर्वाद प्राप्त असलेले राज्य आणि पूर्वोत्तर सीमेवरील एक राज्य. भाजपाला चारही दिशेने आशार्वाद मिळाला आहे. या राज्यांसमोरील आव्हानं वेगळीवेगळी आहेत. सर्वांचे विकासाचे मार्ग वेगळे आहेत. मात्र सर्वांना एका सूत्रात जे बांधत आहे तो आहे भाजापवरील विश्वास. भाजपाचा धोरण, हेतू आणि भाजपाच्या निर्णयावर अपार विश्वास.” असंही मोदींनी सांगितलं.

Story img Loader