माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन नरेंद्र मोदींना दगडात देव असतो का? असा प्रश्न विचारला आहे. तसंच ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं ते लोक नाचत आहेत. मात्र मंदिरामुळे फारसा परिणाम झालाय असं वाटत असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काय म्हटलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी?

“ज्या लोकांनी मोदींना मतदान केलं ते लोक नाचत आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधलं त्यामुळे फारसा काही परिणाम झाला आहे असं वाटत नाही. गावात खासगी मंदिर बांधणं आणि अयोध्येत राम मंदिर बांधणं यात काय फरक आहे? नरेंद्र मोदींना राम मंदिराचा राजकीय फायदा घ्यायचा होता. अयोध्येच्या बाहेर त्याचा प्रभाव नाही. नरेंद्र मोदी इमोशनल ब्लॅकमेलिंग का करतात?, दगडात देव असतो का? मला वाटलं तर मी कऱ्हाड येथील मंदिरात जाईन. मोदींनी मुद्दे घेऊन निवडणूक लढवली पाहिजे” असं परखड मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

मोदींना घालवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे

नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सरकार घालवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. बंडखोरी होते आहे असं लक्षात आलं तर त्या कार्यकर्त्यांना शांत केलं पाहिजे. महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या? यावर चर्चा झाली. त्यानंतर आम्ही दिल्लीतल्या पक्षाशी बोललो. जागांची अदलाबदल होऊ शकते त्यात काही हरकत नाही. मी पक्षाचं नाव घेणार नाही पण दोन पक्षांच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- “काँग्रेस काही वर्षांमध्ये डायनासोरप्रमाणे नामशेष होईल”, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जर कुणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकते. मतदारसंघाची वाटणी, इतिहास, स्थानिक पातळीवरची संघटना या संदर्भात मांडणी झालेली नाही. उशीर झाला आहे हे मान्य आहे. पण पहिल्यांदाच तीन पक्षांची आघाडी झाली आहे. अशोक चव्हाण यांना आम्ही चांगलं खातं देणार होतो. मात्र आता ते राज्याच्या राजकारणातून बाहेर गेले आहेत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रीय पक्षांना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.