झारखंडमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ ठिकणी छापेमारी केली आहे. यामध्ये झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरीदेखील छापा टाकण्यात आला असून या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबरच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने धाडी मारल्या. लोकसभा निवडणूक चालू असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते आणि झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीने ही छापेमारी केली आहे. या छापेमारीत तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या कारवाईवरून आता भारतीय जनता पार्टी काँग्रेसवर टीका करू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या कारवाईनंतर काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे.

झारखंडमधील ईडीच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत उपस्थितांना म्हणाले, “ही सभा संपल्यानंतर घरी जा आणि टीव्हीवर बातम्या पाहा. रांचीत कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका काँग्रेस नेत्याच्या नोकराच्या घरात कोट्यवधी रुपये सापडले आहेत. झारखंडमध्ये नोटांचा डोंगर शोधला आहे, मोदी चोरीचा माल पकडतोय. मी पुन्हा एकदा सांगतो हा मोदी स्वतः काही खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही.” तसेच मोदी यांनी वेळी प्रश्न उपस्थित केला की, प्रत्येक वेळी काँग्रेसवाल्यांकडेच इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे पैसे कसे काय सापडतात? त्यावर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.

News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपा या निवडणुकीत अनेक ठिकाणी पैशांचा गैरवापर करत आहे. आमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतं विकत घेण्याचा प्रकार चालू आहे. खरंतर मोदींनी भ्रष्टाचार कॅशलेस केला आहे. त्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. त्यामुळे त्यांना नोटांची फार गरज भासत नाही. त्यांनी कॅशलेस प्रणालीद्वारे हजारो कोटी रुपयांचा निधी उकळला आहे. निवडणूक रोख्यांद्वारे त्यांनी स्टेट बँकेतून हजारो कोटी रुपये मिळवले आहेत. त्यामुळे त्यांना नोटा हाताळाव्या लागत नाहीत. निवडणूक रोख्यांचं गौडबंगाल सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं आहे, तसेच हा सगळा खेळ बंद केला. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आपण आभार मानायला हवेत.

हे ही वाचा >> “…तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षफुटीच्या घटनाक्रमासह पुस्तक लिहावं”, काँग्रेसचा दोन्ही गटांना टोला

माजी मुख्यमंत्री म्हणाले, मोदी कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात हे निवडणूक रोख्यांच्या खटल्याद्वारे आपल्याला समजलं. मोदी कॅशलेस भ्रष्टाचार करत आहेत. कंत्राटं देताना, एखादी धाड टाकताना, टाकलेल्या धाडी थांबवण्यासाठी, खटले बंद करण्यासाठी, मोदी आणि भाजपाचे नेते वेगवेगळ्या लोकांकडून पैसे उकळताना आपण पाहिलं आहे. मोठमोठ्या नेत्यांचे खटले अलीकडच्या १५ दिवसात त्यांनी बंद केले आहेत. त्याबदल्यात त्यांनी कोट्यवधी रुपये उकळले असावेत. मुळात असे खटले सहसा बंद होत नाहीत. मात्र मोदी सरकारने अनेक खटले बंद केले आहेत. खरंतर गुन्हा घडला असेल तर त्याचा तपास व्हायला हवा. परंतु, मोदींनी त्या बदल्यात पैसे घेतले असावेत.

Story img Loader