Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं होतं. आज ( १३ मे ) कर्नाटकात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. २२४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर तर भाजपा आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) पिछाडीवर असल्याचं निकालावरून दिसत आहे. कर्नाटकात भाजपाची झालेली पिछेहाट हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाला टोले लगावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “बजरंग बली की जय, भाजपाचा पराभव निश्चित आहे.”

हेही वाचा : “कर्नाटकातील निकालांचा महाराष्ट्रावर परिणाम असा की..”, सुषमा अंधारेंची खोचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!

तर, दुसऱ्या ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकातील प्रचारावरून टोमणा लगावला आहे. “पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात केलेल्या प्रचाराला हनुमानाने सुद्धा नाकारलं आहे. माध्यमे जे.पी नड्डा आणि बोम्मई यांचा पराभूत झालेला चेहरा दाखवू शकतात. पण, हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. कारण, प्रचाराची धुरा मोदींनी सांभाळली होती,” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं.

“मोदी-शाहांनी पराभव स्विकारावा”

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना लक्ष्य केलं आहे. “कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. कारण, या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता”, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

हेही वाचा : कर्नाटकात प्रारंभीचे कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“देशाची ‘मन की बात’ कर्नाटकातून बाहेर पडली”

“कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडगारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे गेल तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची ‘मन की बात’ कर्नाटकातून बाहेर पडली”, असा टोलाही संजय राऊतांनी पंतप्रधानांना लगावला आहे.