प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची ऋणी आहे. मी खात्री देते की, कालांतराने तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे, ती तुमच्या आशा आणि स्वप्नांना समजून घेईल आणि तुमच्यातीलच एक व्यक्ती लढतेय असे वाटेल. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे! मला तुम्ही अपेक्षेपेक्षाही अधिक प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी
प्रियांका गांधी यांनी पुढे लिहिले की, UDF सहकारी, केरळचे नेते, कार्यकर्ते आणि या मोहिमेत खूप परिश्रम घेतलेल्या त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘यूडीएफमधील माझे सहकारी, केरळमधील नेते, कामगार, स्वयंसेवक आणि माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी या मोहिमेत अविश्वसनीयपणे परिश्रम घेतले. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, कार प्रवासात मला १२ तास (जेवण नाही, विश्रांती नाही) सहन केले. ज्या आदर्शांवर आपण सर्व विश्वास ठेवतो, त्यासाठी सर्व खऱ्या सैनिकांप्रमाणे लढले.
‘माझी आई, रॉबर्ट आणि माझे दोन रत्न…’ कुटुंबियांचेही मानले आभार
यावेळी प्रियांका गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांचेही आभार मानले. प्रियांका गांधी यांनी लिहिले की, ‘माझी आई, रॉबर्ट आणि माझे दोन रत्न – रेहान आणि मिराया, तुम्ही आम्हाला दाखवलेल्या प्रेम आणि धैर्यासाठी कधीही कृतज्ञता पुरेशी नाही आणि माझा भाऊ, राहुल, तू सर्वात धाडसी आहेस… मला रस्ता दाखवल्याबद्दल आणि माझ्या पाठीवर थाप दिल्याबद्दल धन्यवाद!’