Dilip Khedkar Election Affidavit: दोन महिन्यांपूर्वी बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्धट वर्तनापासून सुरू झालेला हा वाद थेट त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईपर्यंत पोहोचला. दरम्यान त्यांचं क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आई-वडिलांचा घटस्फोट अशा अनेक मुद्द्यांवरून त्या चर्चेत राहिल्या. त्यांचे वडिल दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली होती. त्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या. आता पुन्हा एकदा पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. पण चर्चा त्यांच्या उमेदवारीची नसून त्यांच्या प्रतिज्ञापत्राची आहे!

दिलीप खेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जासह त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील नोंदींवरून सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण दिलीप खेडकर यांनी या प्रतिज्ञापत्रात विवाहित नसल्याची नोंद केली आहे! अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी अहमदनगरमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी अर्जासोबत विवाहित असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या विवाहाविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Pratap Chikhalikar, Pratap Chikhalikar latest news,
प्रताप चिखलीकरांचे पाचवे पक्षांतर !
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
mns declare mayuresh wanjale name as a candidate from khadakwasla constituency
मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी
belapur vidhan sabha
गणेश नाईकांच्या खेळीने दोन्ही शिवसेनेची कोंडी
in Karnataka BJP nominated basavaraj bommai son bharat bommai
कर्नाटकात भाजपमध्ये घराणेशाहीला प्राधान्य, येडियुरप्पानंतर बोम्मई पुत्राला उमेदवारी
mla Rajendra Shingne to join sharad pawar ncp
राजेंद्र शिगणे तुतारी फुंकणार, शरद पवार गटात परतीचा मुहूर्त ठरला!
independent mla kishor jorgewar to contest assembly polls on sharad pawar ncp ticket
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुंकणार? पवार गटाकडून चंद्रपुरातून निवडणूक लढण्याचे संकेत
Dilip Khedkar Affidavit loksabha election
लोकसभा निवडणुकीवाेली दिलीप खेडकर यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र (फोटो – निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील पीडीएफमधून साभार)

काय आहे प्रतिज्ञापत्रात?

दिलीप खेडकर यांनी यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा तपशील लिहिलेल्या रकान्यात स्वत:च्या नावापुढे गेल्या पाच वर्षांत त्यांनी सादर केलेल्या आयकर विवरण पत्रातील उत्पन्नाचा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नावाखाली पत्नीच्या रकान्यात कुणाचंही नाव नसून उत्पन्नाच्या रकान्यांमध्ये ‘लागू नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, त्याखाली अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या रकान्यातही ‘लागू नाही’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, लोकसभेवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी मनोरमा यांच्याबाबतचा तपशील देण्यात आला होता.

Dilip Khedkar Affidavit vidhan sabha election
विधानसभा निवडणुकीसाठी दिलीप खेडकर यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र (फोटो – निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील पीडीएफमधून साभार)

लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात काय?

दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी मनोरमा दिलीप खेडकर असं नाव लिहिलं होतं. तसेच, त्यांचा पॅन क्रमांक पुढे नोंदवून गेल्या पाच वर्षांत त्यांच्या नावे सादर केलेल्या आयकर उत्पन्न तपशीलाच्या नोंदीही या प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी केल्या होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी ‘विवाहित’ असणाऱ्या दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी विवाहित असल्याची कोणतीही नोंद त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेली नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला असण्याची चर्चा रंगू लागली आहे.

Puja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सरकारी सेवेतून बरखास्त; केंद्र सरकारची मोठी कारवाई

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार दिलीप खेडकर व पत्नी मनोरमा खेडकर यांनी २००९ साली कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पुढच्या वर्षी म्हणजेत २०१० साली त्यांचा घटस्फोट मंजूरही झाला होता. पण पूजा खेडकर यांनी त्यांच्या मॉक इंटरव्यूमध्ये आई-वडील वेगळे राहात असल्याचा उल्लेख केला होता. पण दिलीप खेडकर यांनी मात्र २०१९ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा त्यांनी ‘पत्नी’ या रकान्यात ‘लागू नाही’ असा उल्लेख केला आहे.