Pune Lok Sabha Election Results Updates : पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती. वंचित बहुजन आघाडीनेही माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एमआयएम) माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत बघायला मिळाली. ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ किती मते घेणार, यावर मोहोळ यांचा भिस्त असून, धंगेकर यांनी ही मते मिळविल्यास मोहोळ यांचा मार्ग खडतर होईल. त्यामुळे धंगेकरांचा ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेमध्ये चालणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे. दरम्यान, पुण्यात थोड्याच वेळात मतदामोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुण्यातील जनतेचा कौल नेमका कुणाला हे आज स्पष्ट होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील निकाला प्रत्येक अपडेट तुम्हाला इथे वाचता येणार आहे.
Pune Pimpri Chinchwad Lok Sabha Election Results 2024 Updates : मुरलीधर मोहोळ यांचा विजय
पुण्याचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. माझा विजय गिरीश बापट यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Pune Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ७७ हजार मतांनी आघाडीवर
Pune Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, ६६ हजार मतांची आघाडी
Pune Lok Sabha Election Result Live Updates : भाजपचे मुरलीधर मोहोळ ५५ हजार ७३८ मतांनी आघाडीवर
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : सुप्रिया सुळे ४० हजार ४७ मतांनी आघाडीवर
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
Pune Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे मुरलीधर मोहोळ ४८ हजार मतांनी आघाडीवर
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या मतांची 35 हजारहून अधिक जाहीर होताच कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील कार्यालया बाहेर फटाके फोडून, लाडू वाटून आणि गुलाल उधळून जल्लोष केला.
बारामती : Baramati Lok Sabha Election Result Live Updates : सहाव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे २६ हजार मतांनी आघाडीवर
Pune Lok Sabha Election Result Live Updates : पाचव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३५ हजार मतांनी आघाडीवर
बारामती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : सुप्रिया सुळे १४ हजार मतांनी आघाडीवर
Maval Lok Sabha Election Result Live Updates : पाचव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे २१ हजार ७८२ मतांनी आघाडीवर
Pune Lok Sabha Election Result Live Updates : मुरलीधर मोहोळ २१ हजार हजार मतांची आघाडी
बारामती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : चौथ्या फेरीअखेर सुप्रिया सुळे १९ हजार मतांनी आघाडीवर
Pune Lok Sabha Election Result Live Updates : तिसऱ्या फेरीअखेर भाजपाचे मुरलीधर मोहोळ १२६०० मतांनी आघाडीवर
Pune Lok Sabha Election Result Live Updates : पुणे लोकसभेत दुसऱ्या फेरीअखेर वसंत मोरे यांना १ हजार मत
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : बारामती : सुप्रिया सुळे दुसऱ्या फेरीत ११५३२ मतांनी आघाडीवर
बारामती पहिली फेरी
सुप्रिया सुळे
पुरंदर 5175
बारामती 7884
दौंड 4026
इंदापूर 4832
भोर 6177
खडकवासला 5191
सुनेत्रा पवार
पुरंदर 5104
बारामती 4345
दौंड 3823
इंदापूर 5358
भोर 3370
खडकवासला 4552
पुणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.
Pune Lok Sabha Election Result Live Updates : प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघ वडगाव शेरी २२, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, कसबा पेठ प्रत्येकी १४, कोथरुड २० तर पर्वती विधानसभा मतदार संघ क्षेत्रासाठी १८ टेबलवर मतमोजणी होणार असून पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १० टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.तर वडगाव शेरी २१, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, कसबा पेठ व पुणे कॅन्टोंमेंटसाठी प्रत्येकी २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड मतदारसंघासाठी १४ टेबल व २३ फेऱ्या, इंदापूर १६ टेबल व २१ फेऱ्या, बारामती १८ टेबल व २२ फेऱ्या, पुरंदर २० टेबल व २२ फेऱ्या, भोर २४ टेबल व २४ फेऱ्या तर खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी २२ टेबल व २४ फेऱ्या होतील.
विधानसभा - पुरुष - महिला - एकूण - टक्केवारी
वडगावशेरी - १,३२,०७० - १,०९,७१८ - २,४१,८१७ - ५१.७१
शिवाजीनगर - ७३,७९५ - ६७,३२३ - १,४१,१३३ - ५०.६७
कोथरूड - १,१४,४५१ - १,०३,००० - २,१७,४५५ - ५२.४३
पर्वती - ९९,२९८ - ८९,८७१ - १,८९,१८४ - ५५.४७
कॅन्टोन्मेंट - ७८,८२४ - ७१,१४९ - १,४९,९८४ - ५३.१३
कसबा - ८६,०७३ - ७८,०१७ - १,६४,१०५ - ५९.२४
एकूण - ५,८४,५११ - ५,१९,०७८ - ११,०३,६७८ - ५३.५४
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघासाठी कोरेगाव पार्क येथे मतमोजणी होणार आहे. सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण. मतमोजणी मंगळवार ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार.
पुणे लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
भाजपाचे उमेवादर मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरचे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे विरुद्ध ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अनिस सुंडके अशी चौरंगी लढत पुण्यात बघायल मिळाली होती.
पुण्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून थोड्या वेळा या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे