Premium

“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने गदारोळ

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींनी वाजवल्या टाळ्या

Punjab Assembly Election, Punjab CM Charanjit Singh Channi, Bihar, UP, Uttar Pradesh
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींनी वाजवल्या टाळ्या

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. या वक्तव्यावर त्यांनीदेखील हास्यमुद्रा देत टाळ्या वाजवल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर भाजपाने टीका केली असून त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात जिथे काँग्रेस निवडणूक लढवत आहे तेथील लोकांचा प्रियंका गांधींनी अपमान केल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या गरिबीवरुन वाद; भगवंत मान म्हणाले, “१७० कोटींचा गरीब’; जाणून घ्या नेमकी संपत्ती किती?

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “हे खूप लाजीरवाणं आहे. आम्ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. प्रियंका गांधीही उत्तर प्रदेशच्या आहेत त्यामुळे त्यादेखील भैय्या आहेत,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

चन्नींना गरीब घरातील मुख्यमंत्री म्हटल्याने वाद –

राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना मुख्यमंत्री गरीब घरातील असला पाहिजे असं म्हटलं होतं. यामुळे पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या गरिबीची चर्चा रंगली असून विरोधकही त्यांच्या संपत्तीवरुन प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

आम आदमी पक्षाचा निशाणा

आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणारे भगवंत मान यांनी चन्नी यांच्यावर निशाणा साधताना ते १७० कोटींचे मालक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “चन्नी यांच्याकडे फक्त १७० कोटी आहेत. कदाचित राहुल गांधींसाठी ते गरीब आहेत”.

दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंग मजाठिया यांनी म्हटलं आहे की, “राहुल गांधी यांना चन्नी गरीब वाटतात ज्यांनी आपल्या निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात २५ ते २६ कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं आहे”. चन्नी ५०० कोटींचे मालक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थित केला प्रश्न

चन्नी यांच्या गरिबीवरुन फक्त विरोधी पक्ष नव्हे तर त्यांच्या पक्षातील नेतेही प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते नवज्योत कौर सिद्धू यांनी चन्नी गरीब नसून खूप श्रीमंत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या आयकर परताव्याची माहिती देताना त्यांनी गरीब म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे आमच्यापेक्षाही मोठा बंगला आणि बँक बॅलेन्स असल्याचं म्हटलं आहे.

एकीकडे विरोधी पक्षाचे नेते आरोप करत असताना चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे आणि पत्नीकडे ९.४४ कोटींची संपत्ती आहे. चन्नी यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून एमबीए केलं आहे. तसंच लवकरच पीएचडी करणार आहेत.

प्रतिज्ञापत्रानुसार, चन्नी आणि त्यांच्या पत्नीच्या आयटी रिटर्ननुसार त्यांच्याकडे एकूण २७.८४ आणि २६.२१ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय चन्नी यांच्याकडे २.६२ कोटींची जंगम मालमत्ता आहे.

पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांच्यात थेट लढत आहे, भाजपा आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसने येथे हातमिळवणी केली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab assembly election cm charanjit singh channi says dont let up bihar ke bhaiya enter punjab sgy

First published on: 16-02-2022 at 13:49 IST