पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेसने सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. ही घोषणा करत असताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री गरीब घरातील असला पाहिजे असं म्हटलं होतं. यामुळे आता पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या गरिबीची चर्चा रंगली असून विरोधकही त्यांच्या संपत्तीवरुन प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

आम आदमी पक्षाचा निशाणा

चन्नी आतापर्यंत दोन वेळा विधानसभा निवडणूक लढले आहेत. आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणारे भगवंत मान यांनी चन्नी यांच्यावर निशाणा साधताना ते १७० कोटींचे मालक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “चन्नी यांच्याकडे फक्त १७० कोटी आहेत. कदाचित राहुल गांधींसाठी ते गरीब आहेत”.

prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”

दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंग मजाठिया यांनी म्हटलं आहे की, “राहुल गांधी यांना चन्नी गरीब वाटतात ज्यांनी आपल्या निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात २५ ते २६ कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं आहे”. चन्नी ५०० कोटींचे मालक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राहुल गांधींनी ज्यांना ‘गरीबाचा मुलगा’ म्हटलं, ते चरणजीत सिंग चन्नी किती गरीब आहेत? वाचा…

भाजपाचे महासचिव तरुण चुग यांचं म्हणणं आहे की, काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी गरिबाची परिभाषा १७० कोटींचे मालक चरणजीत सिंग चन्नी आहेत. गरिबांची खिल्ली उडवली जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थित केला प्रश्न

चन्नी यांच्या गरिबीवरुन फक्त विरोधी पक्ष नव्हे तर त्यांच्या पक्षातील नेतेही प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते नवज्योत कौर सिद्धू यांनी चन्नी गरीब नसून खूप श्रीमंत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या आयकर परताव्याची माहिती देताना त्यांनी गरीब म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे आमच्यापेक्षाही मोठा बंगला आणि बँक बॅलेन्स असल्याचं म्हटलं आहे.

एकीकडे विरोधी पक्षाचे नेते आरोप करत असताना चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे आणि पत्नीकडे ९.४४ कोटींची संपत्ती आहे. चन्नी यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून एमबीए केलं आहे. तसंच लवकरच पीएचडी करणार आहेत.

प्रतिज्ञापत्रानुसार, चन्नी आणि त्यांच्या पत्नीच्या आयटी रिटर्ननुसार त्यांच्याकडे एकूण २७.८४ आणि २६.२१ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय चन्नी यांच्याकडे २.६२ कोटींची जंगम मालमत्ता आहे.

Story img Loader