पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. विधानसभेच्या ११७ पैकी ९२ जागा जिंकत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा उडवला. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या अकाली दलाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाला एक जागा मिळाली. तर काँग्रेसला १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या. पंजाबमधील आपच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन आपला शुभेच्छा देतानाच पंतप्रधान म्हणून एक आश्वासनही दिलंय.

मोदी नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपा मुख्यलयामध्ये चार राज्यांमधील भाजपाच्या विजयासंदर्भात आयोजित कार्यक्रमात भाषण दिल्यानंतर रात्री १० वाजून १२ मिनिटांनी ट्विट केलं. यामध्ये त्यांनी आपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डललाही टॅग केलं होतं. “पंजाबमधील निवडणुकीत आपचा विजय झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करु इच्छितो. पंजाबच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्ण मदत करेल असं मी आश्वासन देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं.

नक्की वाचा >> Election Results: ‘हा २०२४ चा कौल’ म्हणणाऱ्या मोदींना प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले “साहेबांना हे ठाऊक…”

केजरीवाल यांचा १४ तासांनी रिप्लाय
मोदींच्या या ट्विटला आपचे सर्वेसर्वा आणि संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आज म्हणजेच १४ तासांनी रिप्लाय केलाय. मोदींनी केलेलं ट्विट कोट करुन रिट्विट करताना अरविंद केजरीवाल यांनी, “धन्यवाद सर” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Election Results: काँग्रेसमध्ये पुन्हा फूट?; पाच राज्यांमधील दारुण पराभवानंतर G-23 नेत्यांनी बोलवली बैठक

भाजपाकडे कोणत्या दोन जागा?
विरोधी पक्षनेते हरपालसिंग चीमा तसेच पंजाब भाजपा प्रदेशाध्यक्ष अश्विनी कुमार हे पठाणकोट येथून तसेच काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा हे क्वेदीन तसेच कपूरथळा येथून मंत्री राणा गुरजित सिंग हे विजयी झाले.

नक्की वाचा >> Yogi Cabinet Oath: राजतिलक की करो तैयारी… ‘या’ तारखेला योगी घेणार CM पदाची शपथ; मोदी-शाह राहणार उपस्थित

आपच्या लाटेत दिग्गज पराभूत
बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन होईल असे भाकीत वर्तवले होते, निकालही त्याच दृष्टीने लागला. आपच्या तडाख्यात मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी पराभूत झाले तसेच प्रकाशसिंग बादल तसेच सुखबिर बादल यांनाही धक्का बसला. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठीया तसेच पंजाब सरकारमधील काँग्रेसचे अनेक मंत्री पराभूत झाले.

कोणाला आधी किती जागा होत्या?
२०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसने अकाली दल-भाजपाची दहा वर्षांची राजवट संपवली होती. गेल्या वेळी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाला २० जागा जिंकता आल्या होत्या. अकाली दल-भाजपा आघाडीला १८ तर लोक इन्साफ पक्षाला दोन ठिकाणी यश मिळाले होते. आपचे भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून ५८ हजार २०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या दलविर सिंग गोल्डी यांचा पराभव केला. भगवंत मान यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद येईल.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

भगतसिंग यांच्या मूळगावी शपथविधी
पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी खतर कलन येथे होणार असल्याचे मान यांनी जाहीर केले. त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सरकारी कार्यालयांत भगतसिंग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे असतील. मुख्यमंत्र्यांचे नसेल असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तरावर पर्याय म्हणून पुढे येईल असे पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितले. पंजाबच्या जनतेने केजरीवाल यांच्या सरकारचे प्रारूप स्वीकारल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये आपला ४२ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसला २२ टक्के व भाजपाला ६ तर अकाली दलाला १८ टक्के मते मिळाली.

नक्की वाचा >> Election Results: “काँग्रेस पक्ष ‘तृणमूल’मध्ये विलीन करावा, असं झाल्यास…”; काँग्रेसला ऑफर

मुख्यमंत्री चन्नी दोन्ही मतदारसंघांतून पराभूत
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे भदौर तसेच चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. जनतेचा कौल स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया चन्नी यांनी निकालानंतर दिली आहे. चन्नी यांच्याप्रमाणेच अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल हे जलालाबाद मतदारसंघातून पराभूत झाले. त्याचप्रमाणे त्यांचे वडील अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल हेदेखील लांबी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सुखबीर जवळपास चाळीस हजार मतांनी पराभूत झाले.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

अमरिंदर पराभूत
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा देऊन पंजाब विकास काँग्रेसची स्थापना केली होती. अमरिंदर यांचा पारंपरिक मतदारसंघ अससेल्या पतियाळा शहर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला.

मराठीतील सर्व पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi congratulates aap for historic win in punjab assures centres support arvind kejriwal replied scsg