पंजाब निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून युद्धपातळीवर निवडणुकीचे नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुक प्रचारासाठी ३० जणांची ‘स्टार प्रचारक’ (star campaigners list) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंजाबमधील आनंदपूर साहीब या लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि काँग्रेसच्या कोर ग्रुपमधील नेते म्हणून ओळख असेलल्या मनिष तिवारी (Manish Tewari) यांना स्थान देण्यात आलेले नाही. या यादीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या सचिन पायलट यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

याआधीच पंजाबमधील निवडणुक निर्णय प्रक्रियेतून मनिष तिवारी यांना अप्रत्यक्षपणे दूर ठेवण्यात आले होते. त्यात आता निवडणुक प्रचारातील मुख्य फळीतूनही वगळण्यात आले आहे, त्यामुळे पंजाब निवडणुकीत तिवारी यांना त्यांच्या लोकसभा मतदार संघापूरते मर्यादीत ठेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नाव नसल्याबद्दल थेट प्रतिक्रिया मनिष तिवारी यांनी दिलेली नाही. मात्र तिवारी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि सध्याचे तृणमुल काँग्रेसचे सदस्य असलेल्या माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित मुखर्जी यांनी मनिष तिवारी यांचे नाव प्रचारकांच्या यादीतून वगळल्याबद्द्ल नाराजी व्यक्त करत काँग्रेसचा कारभारबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेव्हा जर माझे नाव यादीत असते तर जास्त आश्चर्य वाटले असते अशी प्रतिक्रिया अभिजीत मुखर्जी यांच्या ट्वीटवर मनिष तिवारी यांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत आणि संघटनेच्या कामकाजाबद्द्ल काही प्रश्न काँग्रेसमधील एका गटाने सोनिया गांधी यांना पत्र लिहित उपस्थित केले होते. या गटाला जी-२३ नावाने ओळखले जात आहे. या गटावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी उघडपणे टीकाही केली होती. या गटामध्ये मनिष तिवारी सहभागी होते. निवडणुक प्रक्रियेपासून मनिष तिवारी यांना दूर ठेवत एकप्रकारे काँग्रेस श्रेष्ठींनी जी -२३ गटातील काही लोकांबद्द्ल नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे.

Story img Loader