पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची मुलगी राबिया सिद्धू ही तिच्या वडिलांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना राबिया सिद्धूने सांगितले की, जोपर्यंत तिचे वडील जिंकणार नाहीत. तोपर्यंत ती लग्न करणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरं तर, यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते की, माझ्याकडे माझ्या मुलीच्या लग्नासाठीही पैसे नाहीत. यावर राबियाने सांगितलं की, “त्यांनी भावनिक होत असं विधान केलंय. मी स्वत:च म्हटलं आहे की, मी तोपर्यंत लग्न करणार नाही जोपर्यंत माझे वडील जिंकत नाहीत. ते मला सदैव प्रोत्साहन देत असतात, माझ्यासाठी त्यांच्याकडे सर्वकाही आहे. मग असं कसं होईल की त्यांच्याकडे माझ्या लग्नासाठी पैसे नाहीत.”

याशिवाय पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर राबिया सिद्धू यांनी एएनआयला म्हटले आहे की, “कदाचित हायकमांडची काही मजबुरी असावी. पण तुम्ही प्रामाणिक माणसाला जास्त काळ रोखून ठेवू शकत नाही आणि अप्रामाणिक माणसाला शेवटी थांबावेच लागते.”