लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. पाचवा टप्पा येत्या सोमवारी म्हणजेच २० मे रोजी पार पडणार आहे. या अनुषंगाने प्रचारसभा आणि मुलाखतींचं सत्र सुरु आहे. एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना राफेल कराराविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर मोदींनी दिलं आहे. तसंच राहुल गांधी तुमच्यावर उद्योगपतींशी मैत्री केली आहे आणि तुम्ही त्यांचं भलं करता असा आरोप करतात या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“मी लाल किल्ल्यावरुन जेव्हा बोलतो तेव्हा मी संकोच न बाळगता सांगतो की वेल्थ क्रिएटर्सचा आदर झाला पाहिजे. हे लोक देशातले सक्षम लोक आहेत, सामर्थ्य असणारे लोक आहेत. १५ ऑगस्टला जे मान्यवर पाहुणे असतात त्यांच्यात खेळाडू, विविध क्षेत्रात नाव कमवलेले लोक असतात. जर देश यश मिळवणाऱ्यांची पूजा करणार नाही तर मग कोणाची पूजा करणार? वैज्ञानिक कसे तयार होतील? ज्यांनी आपल्या आयुष्यात आपलं लक्ष्य गाठलं आहे त्यांचं कौतुक झालंच पाहिजे.” आज तकला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- मुस्लीम समाजाबाबत मोदींचं घूमजाव! ‘मंगळसूत्र खेचतील’ पासून ‘ताजियाच्या मिरवणुकी’पर्यंत काय काय म्हणाले?

मंगळसूत्राचा मुद्दा का काढला?

मी माझ्या भाषणांत मंगळसूत्राचा मुद्दा काढला होता यावरुन माझ्यावर टीका झाली. मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हे लिहिलं आहे की कंत्राटी कामं देण्याच्या पद्धतीतही ते अल्पसंख्याकांना आणणार. समजा एका गावात ७०० लोक राहतात, त्यातल्या एखाद्या योजनेसाठी १०० लोक पात्र आहेत. तर मला वाटतं की १०० मधल्या प्रत्येकाला तो हक्क मिळाला पाहिजे. यामध्ये जात-पात-धर्म काहीही यायला नको. आम्ही कधीही आमच्याकडून हिंदू -मुस्लिम हा भेद केला नाही. मी मंगळसूत्राचा उल्लेख केला त्यात मी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय म्हटलंय ते सांगत होतो. मी मुस्लिम बांधवांना हे देखील सांगितलं की ७५ वर्षांपासून काँग्रेसचे लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. असं उत्तरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.

बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा काढला

“आपल्या देशातलं गांधी कुटुंब एका ओझ्याखाली जगतं आहे. पंडित नेहरुंना शिव्या पडायच्या. त्यावेळी त्यांना बिर्ला-टाटा यांचं सरकार असं मह्टलं जायचं. पंडित नेहरु संसदेत हे सगळं ऐकून घ्यायचे. आता यांची समस्या ही आहे की जी दुषणं यांच्या पणजोबांना लागली आहेत ती मोदींच्याही नावापुढे लागली पाहिजेत. त्यामुळे हे मला दुषणं देत असतात. बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा त्यांनी काढला. काँग्रेस या लोकांना (राहुल गांधी) मानसिक आजार जडला आहे. जे माझ्या पणजोबांना बोललं गेलं ते मोदींनाही बोललं पाहिजे. “

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafale issue raised to wash sins of bofors said pm narendra modi scj
Show comments