कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकात ठाण मांडून आहेत. त्यातच राहुल गांधींचा हटके अंदाज आज समोर आला आहे. राहुल गांधी यांनी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारला आहे.

प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये राहुल गांधी ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशातच राहुल गांधी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहचले. राहुल गांधींनी डिलीव्हरी बॉयबरोबर दुचाकीवरून २ किलोमीटर प्रवास केला. त्यापूर्वी राहुल गांधींनी एका चिमुरड्याशी आपुलकीने चर्चा करत, फोटो काढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Narhari Zirwal On Sharad Pawar
Narhari Zirwal : “शरद पवारांकडे जाणार आणि लोटांगण घालून…”, अजित पवार गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचा : भाजपपासून सुटकेनंतरच कर्नाटकची प्रगती – सोनिया गांधी

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बंगळुरूमध्ये आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी ( ६ मे ) २६ किलोमीटरचा रोड शो केला होता. त्यानंतर आजही पंतप्रधानांनी १० किलोमीटरचा रोड शो केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने फुलं घेऊन उभे होते.

हेही वाचा : कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून दिशाभूल; पंतप्रधानांचे टीकास्त्र

कमिशनवरून राहुल गांधींची भाजपावर टीका

“मागील तीन वर्षात कर्नाटकात चोरीचे सर्व उच्चांक मोडले आहेत. देशातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार कर्नाटकातील आहे. कंत्राटदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहित ४० टक्के कमिशनची माहिती दिली होती. पण, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं नाही. पंतप्रधान कर्नाटकात येतात, मात्र भ्रष्टाचाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध काय पावले उचलली, याबद्दल कर्नाटकातील तरुणांना पंतप्रधानांनी माहिती दिली पाहिजे,” असे आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.

Story img Loader