भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज (३ मे) सकाळी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या लोकसभेच्या दोन पारंपरिक जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली. पाठोपाठ दोन्ही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा याना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसच्या उमेदवारांनी मुदत संपण्याच्या काही वेळ आधी त्यांचे अर्ज दाखल केले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. या जागेवरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. तर काँग्रेसचा दुसरा सर्वात मोठा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना पराभूत केलं होतं. राहुल गांधी यांनी यंदा अमेठीतून निवडणूक लढणं टाळलं आहे. तर पक्षाने त्यांना निवडणूक जिंकणं सोपं असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. निवडणुकीचं तिकीट जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज गांधी, नेहरू परिवारातील अरुण नेहरू, शीला कौल आणि २००४ पासून सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार राहिल्या आहेत. मात्र यंदा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. तर रायबरेलीतून पक्षाने राहुल गांधी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

दरम्यान, ज्या मतदारसंघातून आई सोनिया गांधी गेल्या २० वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवत आली आहे त्याच मतदारसंघातून यंदा उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी भावुक झाले होते. राहुल यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा >> मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”

राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, रायबरेलीतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणं हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण होता. माझ्या आईने आमच्या कुटुंबाची कर्मभूमी मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सोपवली आहे आणि रायबरेलीतील लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ माझ्यासाठी वेगवेगळे नाहीत. दोन्ही मतदारसंघ मला माझ्या कुटुंबासारखेच आहेत. मला आनंद वाटतो की, गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसची सेवा करणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना यंदा अमेठीतून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. अन्यायाविरुद्ध चालू असलेल्या न्यायाच्या या युद्धात मी माझ्या जवळच्या लोकांकडून केवळ प्रेम आणि आशीर्वाद मागतोय. मला विश्वास आहे की, संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर उभे आहात.

Story img Loader