पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून (एक्झिट पोल) व्यक्त करण्यात आला आहे. सलग १० वर्षे सत्तेत राहूनही देशात सध्या तरी भाजपाविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या पोल्समधील अंदाज चुकीचे असल्याचे दावे विरोधी पक्षांकडून होत आहेत. तर पंतप्रधान मोदी यांनी या पोल्सवर प्रतिक्रिया देताना ‘संधीसाधू’ आघाडी जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यापाठोपाठ इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या एक्झिट पोल्सवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, “प्रसारमाध्यमांवर दाखवले जातायत ते एक्झिट पोल्स नाहीत, ते मोदी मीडिया पोल्स आहेत. ते मोदींचे फॅन्टसी (कल्पना) पोल्स आहेत. तुम्ही सिद्धू मूसेवालाचं (दिवंगत पंजाबी गायक) २९५ हे गाणं ऐकलंय का? आमच्या इंडिया आघाडीच्या तेवढ्या जागा येतील.” नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “हे एक्झिट पोल्स केवळ मोदींच्या कल्पना आहेत.”

Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी (१ जून) सायंकाळी पार पडल्यानंतर अनेक संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये रालोआला (एनडीए) सरासरी ३५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही जेमतेम १२५ ते १५० जागांपर्यंत मजल मारू शकते, असं या चाचण्यांमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा >> कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; प्रज्वल रेवण्णाकडून एसआयटीच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरं

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १३ एक्झिट पोल्समध्ये एनडीएला ३०६ आणि काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये भाजपा आणि एनडीएला एक्झिट पोल्समधील अंदाजांपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ३०३ तर एनडीएने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. त्या विजयापेक्षाही मोठा विजय भाजपा साकार करेल, असा अंदाज यावेळच्या एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या सलग तिसऱ्या विजयात हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांमधील घवघवीत यश प्रभावी ठरेल, असं या एक्झिट पोल्समध्ये म्हटलं आहे.

Story img Loader