Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यशामुळे सत्तांतर होण्याची तर मध्य प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखण्याचा अंदाज आहे. सध्याच्या मतमोजणीच्या कौलनुसार भाजपा या तिन्ही राज्यांत सत्ता स्थापन करू शकणार आहे. तर, तेलंगणात बीआरएसचा धोबीपछाड करत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राजकीय सध्यस्थितीवरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

सायंकाळी ६.३० पर्यंतच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपा ३४ आणि काँग्रेस ३६, मध्य प्रदेशात भाजपा १६३ आणि काँग्रेस ६६, राजस्थानमध्ये भाजपा ११५ आणि काँग्रेस ६९ आणि तेलंगणात काँग्रेस ६४, बीआरएस ३९ आणि भाजपा ४ जागांवर आघाडीवर आहे. येत्या काळात हा निकालही स्पष्ट होणार आहे. म्हणजेच, चारपैकी तीन राज्यांत भाजपाची यशस्वी वाटचाल सुरू आहे तर, तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पोस्ट केली आहे.

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हेही वाचा >> तीन राज्यांत भाजपाचा विजय निश्चित; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

“मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रतेने स्वीकारत आहोत. विचारांची लढाई सुरूच राहील”, असं राहुल गांधींनी अपयश स्वीकारत म्हटलं आहे.

तर, “तेलंगणाच्या लोकांचे मनापासून आभार. लोकांचं तेलंगणा बनवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील. सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आणि समर्थनासाठी मनपूर्वक आभार”, असं राहुल गांधी म्हणाले.

मध्य प्रदेशच्या निकालानंतर कमलनाथ याची प्रतिक्रिया काय?

आम्ही या निवडणुकीच्या निकालावर विचार करू. आमच्यात काय कमतरता आहेत याचं आत्मपरिक्षण करू. आम्ही मतदारांना आमचं म्हणणं का समजून सांगू शकलो नाही, यावर चर्चा करू. उमेदवार जिंकलेला असो, अथवा पराभूत झालेला असो; सगळ्यांशी चर्चा करू. त्या चर्चेनंतर आम्ही या निकालाचा निष्कर्ष काढू.