MNS Candidate 1st List : राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!

Raj Thackeray MNS Candidate 1st List : भाजपाने पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता मनसेनेही पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत दोघांची नावे आहेत.

MNS First List of Candidates
मनसेच्या पहिल्या यादीत दोघांची नावे जाहीर (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MNS Vidhan Sabha Election 2024 Candidate List Announced : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भाजपाने काल (२० ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या समोर येऊ लागल्या. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना आता राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली आहे. त्यांनीही आज दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. ते डोंबिवली बोलत होते.

“उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
ncp ajit pawar
चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपचे काम न करण्यावर ठाम तर भाजपने दिला ‘हा’ इशारा
Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
MNS president Raj Thackeray to inaugurate Raju Patils election central campaign office in Dombivli
Maharashtra News : मनसेच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
Eknath Shinde and shilpa bodkhe resign
Shilpa Bodkhe : आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आता शिंदेंच्या शिवसेनेलाही रामराम; ‘या’ महिला नेत्याची आठ महिन्यांत शिवसेनेला सोडचिठ्ठी!
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital for Angioplasty
Uddhav Thackeray Hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे आले होते. कल्याण ग्रामीणमधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत. तेथेच त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या नावांची घोषणा केली.

लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानसभेत एकला चलो रे…

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसेने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन महायुती सोबत न राहता आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या काळात महायुतीबरोबर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांचा सामना आता भाजपा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी झटून काम केले होते. कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीला नकारात्मक वातावरण असुनही स्थानिक शिवसेना कार्यकर्ते, आमदार पाटील यांनी झटून केलेल्या कामामुळे खा. शिंदे यांचे या भागातील मताधिक्य वाढले होते.

आता महायुतीमधून मनसे बाहेर पडल्याने राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये एकाकी लढत द्यावी लागणार आहे. या मतदारसंघात राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत ते दिवा भागाने दिलेल्या साथीने सहा ते सात हजाराच्या फरकाने निवडून आले होते.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाचे वारे

कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आणि दोन्ही शिवसेनामध्ये रंगणार संग्राम

राजू पाटील यांची लढत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर, शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात भाजपमधून कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thacekray declare two candidates raju patil and avinash jadhav for vidhansabha election 2024 sgk

First published on: 21-10-2024 at 17:55 IST

संबंधित बातम्या