महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा १८ वर्षे पूर्ण झाली. पक्षाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने मोठं यश मिळवलं होतं. पहिल्याच प्रयत्नात मनसेचे १३ आमदारही निवडून आले होते. नाशिक महापालिकेवर मनसेने झेंडा फडकवला होता. मात्र त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंच्या या पक्षाची पिछेहाट झाली. महाराष्ट्रात गेल्या चार दशकांमध्ये कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता आलेली नाही. प्रत्येक वेळी राज्यात युती किंवा आघाडीची सरकारे बनली आहेत. अशा स्थितीत मनसेने मात्र कधीच कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. अनेक निवडणुकांमध्ये संधी मिळूनही मनसेने नेहमीच ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मनसेने अशी राजकीय भूमिका का घेतली. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर दिलखुलास मतं व्यक्त केली. तसेच मनसेने आजवर कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी का केली नाही यावरही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “राजकारणात आम्ही आजवर इतरांसाठी अस्पृश्य राहिलो आहोत.” यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, जागावाटप तुम्हला कधी जमलं नाही असं तुम्ही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितलं होतं. ते का जमत नाही? राज ठाकरे म्हणाले, तो माझा स्वभावच (temperament) नाही.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

राज ठाकरे म्हणाले, मी १९९५ साली शेवटचा जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो, शिवसेनेसाठी तेव्हा त्या बैठकीत बसलो होतो. माझ्यासमोर भाजपाकडून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि इतर काही नेते होते. तर, आमच्याकडून म्हणजेच शिवसेनेकडून मी होतो, उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यासह काही इतर नेते त्या बैठकीला होते. मी तेव्हा २६ वर्षांचा होतो. त्या वयात एक वेगळा जोश असतो. मात्र गेल्या १८ वर्षांत माझ्यावर जागावाटपाच्या चर्चेला बसण्याची कधी वेळच आली नाही. निवडणुका आल्या… पक्षाचे उमेदवार जाहीर केले की माझं काम झालं… त्यानंतर थेट प्रचार… तुम्ही पाच जागा घ्या, मला इतक्या जागा द्या… दोन जागा तिकडे सरकवा… माझ्या दोन जागा इकडे द्या… ही असली चर्चा मला जमतच नाही. पुढच्या वेळी म्हणजेच भविष्यात कधी तशी वेळ आलीच तर माझ्या पक्षातले लोक जागावाटपाच्या चर्चेला जातील.

हे ही वाचा >> मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”

यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही मोदींविरोधात भूमिका घेतली. तुमचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य देशभर गाजलं. तुम्ही मोदींविरोधात कडवी भूमिका घेतलेली असताना, त्यांच्याविरोधात प्रचार करत असताना इतरांनी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला बरोबर घेण्याचा विचार का नाही केला? यावर राज ठाकरे म्हणाले, नाही, खरंतर यांना (महाविकास आघाडी) सत्तेवरून हकलवण्यात आलं आहे. यांचे पक्ष फुटले आहेत म्हणून आज हे लोक विरोधात आहेत. आज मोदींना किंवा भाजपाला विरोध करण्यासाठी हे लोक जी काही कारणं देत आहेत ती बोगस आहेत. केवळ यांना (शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट) मुख्यमंत्रीपद दिलं नाही, म्हणून आज हे विरोधात आहेत. त्यावेळी यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज हे भाजपाच्या किंवा मोदींच्या विरोधात बोलले असते का? यांना काहीतरी हवं होतं, जे मिळालं नाही म्हणून आज यांनी विरोधातील भूमिका घेतल्या आहेत. मला जेव्हा जेव्हा, ज्यांच्या ज्यांच्या भूमिका पटल्या नाहीत त्यावर मी ठामपणे बोललो आहे. मला काही गोष्टी आजही पटत नाहीत आणि मी त्या उघडपणे बोलतो.

Story img Loader