महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. पक्षाची स्थापना होऊन आता १८ वर्षे झाली आहेत. या १८ वर्षांच्या काळात मनसेने अनेक चढ-उतार पाहिले. पक्ष स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात हा पक्ष राज्यात जोमात होता. मात्र नंतरच्या काळात पक्षाची मोठी अधोगती झाली आहे. पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा, शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये गेले. राज ठाकरेंचा राज्यभरातला करिष्मा कायम असला तरी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत फारशी मतं मिळताना दिसत नाहीत. राज ठाकरेंच्या सभांना खूप मोठी गर्दी होते. मात्र त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही. याचं महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांना, जनतेला आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांना देखील कुतूहल आहे. यावर राज ठाकरे यांनी परखड भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी (३ मे) बोलिभिडूला दिलेल्या मुलाखतीत मनसेची आजवरची कामगिरी आणि पुढील ध्येयांबाबत माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, लोक अडचणीच्या काळात राज ठाकरेंच्या घराचं दार ठोठावतात, वेगवेगळ्या संघटना आणि लोक मदतीसाठी कृष्णकुंजवर (राज ठाकरे यांचं निवासस्थान) जातात. मात्र निवडणुकीच्या काळात हेच लोक राज ठाकरेंना मतदान का करत नाहीत? मतदानाच्या वेळी पाठ का फिरवतात? यावर राज ठाकरे म्हणाले, लोक मतं देतील. हा एक उताराचा टप्पा आहे. हा टप्पा संपेल.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

राज ठाकरे म्हणाले, लोक मतं देतील देतील, यापूर्वी देखील त्यांनी मनसेला मतं दिली आहेत. पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत माझे १३ आमदार निवडून आले होते. त्याचवेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या अनेक उमेदवारांना लाख लाख, दीड लाख, दोन लाख मतं मिळाली होती. परंतु, असाही एखादा टप्पा येतोच. तुम्ही माझ्या पक्षाच्या १८ वर्षांचं काय घेऊन बसला आहात, १९५२ साली सुरू झालेल्या जनसंघाला २०१४ साली पहिल्यांदा बहुमत मिळालं होतं. मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं होतं. मात्र ते एकट्या भाजपाचं सरकार नव्हतं. अनेक पक्षांनी मिळून बनवलेले ते सरकार होतं. मात्र खऱ्या अर्थाने तेव्हाच्या जनसंघाला म्हणजेच आजच्या भाजपाला २०१४ मध्ये सत्ता मिळाली. किती मोठा काळ गेला बघा. परंतु, त्या भाजपाला कोणी प्रश्न विचारला का, की पक्ष स्थापन करून इतकी वर्षं झाली, परंतु इतक्या वर्षांमध्ये लोकांनी तुम्हाला मतं का दिली नाहीत?

हे ही वाचा >> नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत

शिवसेनेची परिस्थिती देखील भाजपासारखीच आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. मात्र शिवसेनेला १९९५ मध्ये सत्ता मिळाली. प्रत्येक पक्षाला एवढा काळ द्यावाच लागतो. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचायला एवढा वेळ नक्कीच लागला आहे. मात्र सध्याची मानसिकता अशी आहे की वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण मी बटाटे आणायला जाणार नाही, माझ्या हातात बटाटा वडा तयार करून द्या, अशी अनेकांची मानसिकता आहे. माझ्या हातात फक्त बटाटा वडा द्या मी तो तेलात टाकतो, तळून आला की खातो. परंतु त्यासाठी मी पीठ तयार करणार नाही, बटाटे शिजवून घेणार नाही. आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेणार नाही. हे सगळं करण्याची कोणाची तयारीच नाही, त्यात कोणाला रसच नाही

Story img Loader