राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली होती.
Raj Thackeray Assembly Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे म्हणाले, “युती करायची का? कुणाबरोबर जायचं? हे सगळं आपण नंतर ठरवू. मनसेची सत्ता आली पाहिजे यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत.” लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते महायुतीत जातील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
दरम्यान, राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा करताना मनसेच्या नेते व पदाधिकाऱ्यांना २२५ ते २५० जागा लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर “निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांची आकडेवारी बदलेल” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते तथा खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. तर “राज ठाकरे यांना महायुतीत आणू”, असं वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.
नारायण राणे म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनी २०० पेक्षा जास्त जागांवर तयारी करण्याच्या सूचना त्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत. परंतु, निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू होईपर्यंत किंवा निवडणूक सुरू होईपर्यंत हेच आकडे कायम राहतील की नाही याबाबत साशंकता आहे. आपण वाट पाहूया, कदाचित ही आकडेवारी बदलेल. ही आकडेवारी वाढणार की कमी होणार ते आपल्याला येत्या काळात समजेल. निवडणुकीत बऱ्याचदा तडजोडी कराव्या लागतात. अनेक बदल होऊ शकतात.
दीपक केसरकर म्हणाले, निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. प्रत्येक पक्ष सर्व जागांवर चाचपणी करत असतो. सर्व जागांवर लढण्याची तयारी करत असतो. परंतु, जेव्हा बोलणी सुरू होते, तेव्हा केवळ महत्त्वाच्या जागांवर विचार होतो. तेव्हा सर्व पक्ष ज्या जागा निवडून येऊ शकतात त्यावर आग्रही असतात. जागा वाटपावर एकमत झाल्यानंतर युती होते. आमची आता महायुती आहे. राज ठाकरे यांनी आमच्या महायुतीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावेळी देखील ते आमच्याबरोबर येऊ शकतात. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे ते आमच्या विचारांचे आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे त्यांना आवडली आहेत. त्यामुळे मला वाटतं आमच्यात बोलणी होऊ शकते आणि त्यांचं मतपरिवर्तन देखील होऊ शकतं.