Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तीन पक्षांना २२० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपाचे १३० हून जास्त आमदार निवडून आले आहेत. भाजपासाठीचं हे सर्वात मोठं यश आहे. तसंच महायुतीचंही हे घवघवीत यश आहे. त्यानंतर आता राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी काय म्हटलं आहे?

महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळालं आहे. भाजप १३३, शिवसेना ५५ , अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस १८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार यांनी माध्यमांना संबोधित केलं. सर्वजण आपापले अंदाज व्यक्त करत होते. शुक्रवारी वेगवेगळी चॅनल्स पाहत होतो. बाकीच्यांचं गाड्या फिरवणं, इकडं जाणं तिकडं जाणं सुरु होतं. आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ असं वाटत होतं. मात्र, कालचं सर्व पाहिल्यावर आम्ही खाली जातो की काय असं वाटत होतं. परंतु, महाराष्ट्रातील जनतेनं विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं यश मिळवून दिलं आहे. त्याबद्दल महायुतीच्या वतीनं जनतेचं आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या विजयाचं श्रेय माझी लाडकी बहीण योजनेला दिलं.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हे पण वाचा- Mahayuti vs Maha Vikas Aghadi Winner : महायुती की महाविकास आघाडी? तुमच्या मतदारसंघात कोण ठरलं वरचढ? वाचा २८८ मतदारसंघांची संपूर्ण यादी!

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीही जनतेचे आभार मानले. त्याच प्रमाणे आमची जबाबदारी आता वाढली आहे असंही या दोघांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही योग्य प्रकारे कारभार करु आणि एकोप्याने राहू असंही म्हटलं आहे. मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमताहून जास्त मतदान केलं आहे. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या सगळ्यावर राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच… अशी पोस्ट राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) केली आहे. राज ठाकरेंनी १२८ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. राज ठाकरेंना त्यांचा मुलगा अमित ठाकरे जिंकून येतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. त्यानंतर राज ठाकरेंनी आता ही पोस्ट केली आहे.

अमित ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

अमित ठाकरेंनी पराभव मान्य असल्याची पोस्ट केली आहे. तसंच मी माहिमकरांची सेवा करत राहीन असंही म्हटलं आहे.

D

Story img Loader