विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. मनसेनेही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तसंच राज ठाकरे जोरदार प्रचारसभाही गाजवत आहेत मुंबईतल्या भांडुप या ठिकाणी राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) जी सभा घेतली त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले.

काय म्हणाले राज ठाकरे?

“मी महाराष्ट्रात सध्या फिरतो आहे, सगळीकडे ऐकायला काय मिळतं? आमच्याकडे नोकऱ्या नाहीत, कामधंदा नाही, रोजगार नाही. त्यामुळे आमच्याकडची मुलं मुंबई-पुण्याकडे जात आहेत. तर मुंबई-पुण्यातली मुलं काय म्हणतात? आमच्याकडे चांगलं वातावरण नाही आम्हाला भारतात राहायचं नाही. इथली मुलं परदेशात जात आहेत. ग्रामीण भागातली मुलं मुंबई-पुण्यात येत आहेत. सगळीकडून बोजवरा उडाला आहे.” असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता…
Nitin Gadkari, Mahadevrao Shivankar, Amgaon,
एकाच पक्षातील मतभेद असलेले दोन माजी मंत्री समोरासमोर… एक रुग्णशय्येवर, दुसरा….
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
Vijay Wadettiwar, Bramhapuri Vijay Wadettiwar,
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन

उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले राज ठाकरे?

या लोकांचे फक्त राजकीय खेळ सुरु आहेत. कारण तुम्हाला गृहीत धरतात हे लोक. कुणाला कुठला पक्ष आवडवा हा विषय नाही. पण कुठल्या पक्षाने काय करावं? बाळासाहेब ठाकरेंची एक मुलाखत आहे. त्यात बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करुन टाकेन. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि आमचे बंधू हाताच्या पंजाचा प्रचार करत आहेत. काय दुर्दैव बघा. बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल. मी काय करुन ठेवलं आणि आज काय झालं आहे त्याचं. मतभेद असू शकतात. सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी शिवसनेनेतून बाहेर पडलो, मला काही गोष्टी नाही पटल्या. माझ्याकडे ३८ आमदार आणि ८ खासदार आले होते. मला म्हणाले होते आपण काँग्रेसमध्ये जाऊ. मी त्यांना म्हटलं मुळीच नाही. मला शिवसेना पक्ष फोडून काहीही करायचं नव्हतं. जर करायचं होतं तर माझ्या हिंमतीवर, माझ्या ताकदीवर. पक्ष वगैरे फोडून काही करायचं नव्हतं.” राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी हे उदाहरण देऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

मनसेची आंदोलनं तुम्ही लक्षात ठेवणार की नाही?

राज ठाकरे ( Raj Thackeray ) पुढे म्हणाले, काहीतरी उदाहरणं ठेवणार की नाही? आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं तुम्ही लक्षात ठेवणार की नाही? कुणीही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक ते काम करत आहेत. जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही मतदान कसं करता? ही कुठली पद्धत? सगळ्यांच्या अडचणींच्या काळात राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आठवतात. मतदानाच्या दिवशी काय होतं मग? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. तुमचा मोबाइल फोन काढून पाहा. एक काळ असा होता जेव्हा हिंदी आणि इंग्रजीच ऐकू यायचं. मात्र मनसेने याला वाचा फोडली. मी इशारा दिला होता ४८ तासांच्या मराठी ऐकू आलं पाहिजे. मी सगळ्या कंपन्यांना सांगितलं. आज पहिली भाषा मराठी ऐकून येते मोबाइलवर. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आहे हे विसरु नका असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.