Raj Thackeray Press Conference: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार शुक्रवारी बीडमध्ये घडला. या प्रकरणावरून मनसेच्या अनेक नेते-पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक शब्दांत टीका केली आहे. तसेच, या प्रकरणात शिवसेना उबाठा व शरद पवार गटाचा सहभाग असल्याचे आरोपही होत होते. या सर्व प्रकरणावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर सविस्तर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांची थेट नावं घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

यावेळी आरक्षणाच्या संदर्भात आपण केलेल्या विधानावर जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या आल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. “मी सोलापूरमध्ये जे बोललो, ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध वगैरे. वाट्टेल त्या बातम्या आल्या. २००६ साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Sharad Pawar on Uddhav and devendra fadnavis
उद्धव ठाकरेंची शाहांवर टीका, फडणवीसांबाबत अवाक्षर नाही, नव्या मैत्रीचे संकेत? शरद पवार म्हणाले…

“देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाहीये. इथे इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळत असताना आमच्या मुला-मुलींना त्या गोष्टी इथे मिळत नाहीत. आपण जर इथल्या मुलांसाठी या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याकडे आरक्षणाची गरजच नाहीये. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचं राजकारण केलं जातं आणि माधी भडकवली जातात”, असंही राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार व उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य केलं. “माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी या प्रकारचं राजकारण करत आहेत. मराठवाड्यात मला ते दिसतंय. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सहभागी आहेत. मला त्यांची नावंही माहिती आहेत. ती योग्य ठिकाणी जातीलही. कुणाला पेव्हर ब्लॉकचे काँट्रॅक्ट्स मिळाले, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाल्या, कुणाला किती पैसे मिळाले, त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत. धाराशिवमध्ये तर तिथल्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी तिथल्या लोकांना वर बोलवत असताना पत्रकार म्हणत होते खाली या. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे काही लोक होते”, असा गंभीर दावा यावेळी राज ठाकरेंनी केला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा ताफा अडवल्याप्रकरणी संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “शेवट…”

“काल जे झालं(बीडमधील सुपारी फेक प्रकरण), त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता. लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यात मतदान झालं. पहिली गोष्ट शरद पवार व उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे की ते नरेंद्र मोदी अमित शाह यांच्याविरोधात झालेलं मतदान होतं. विरोधकांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्यामुळे त्यांना जी मतं मिळाली, मुस्लीम समाजानं देशभरात मोदींविरोधातली मतं दिली. दलित बांधवांनी भाजपाच्या विरोधात मतं दिली. पण या दोघांना वाटतंय की यांच्या प्रेमाखातर ते मतदान झालंय. त्यांना वाटतंय येत्या निवडणुकीतही अशीच खेळी करावी”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस वक्तव्य करतो की महाराष्ट्रात मणिपूर होईल? या लोकांनी मणिपूर होऊ नये याची चिंता करायला हवी. पण ते असं म्हणत असतील तर यांच्या डोक्यात काय असेल याची कल्पना यावी. पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना मराठवाड्यात ज्या काही गोष्टी घडवायच्या असतील, त्या घडवण्यासाठी यांच्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत”, असा थेट आरोप राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.

Story img Loader