Raj Thackeray vs Sanjay Raut Marathi Ideology : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षस्थापनेपासून किंबहुना त्याआधी शिवसेनेत होते तेव्हापासून सातत्याने मराठी माणूस, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत. मात्र त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. “राज ठाकरे देखील गुजराती व्यापारी व नेत्यांच्या बाजूने उभे असल्याची टीका राऊत यांनी केली. महाराष्ट्राबद्दल, मराठी अस्मितेबद्दल राज ठाकरे जे काही बोलतात त्याला काही किंमत नाही, मोरारजी देसाईंनंतर राज ठाकरेच आहेत ज्यांना दोन्ही राज्यांचं नेतृत्व करायचं आहे”, असं राऊत म्हणाले.

शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले, “राज ठाकरे काय वक्तव्ये करतात याला महाराष्ट्रात आता किंमत नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असं वाटत नाही. मोरारजी देसाईंनंतर आता राज ठाकरेच आहेत असं त्यांना वाटतं. मराठी अस्मितेबद्दल त्यांच्या मनात काय आहे याबाबतची शंका कायम आमच्या मनात राहील. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र स्वाभिमानाचा व अस्मितेचा प्रचार करत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख व शरद पवार यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. त्यात जनता त्यांच्याबरोबर आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं”, फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा; औरंगजेबाचा उल्लेख करत म्हणाले…

…अन् आम्हाला मोरारजी देसाई आठवले : राऊत

संजय राऊत म्हणाले, “गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राची लूट चालवली आहे आणि हे (राज ठाकरे) महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. त्यांच्या वागण्यामुळे व त्यांची कृती पाहून आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली हे दुर्दैव आहे. राज ठाकरे हे महान नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी भान ठेवावं ते शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लढाई महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यांविरोधात आहे. विक्रोळीत राज ठाकरे यांना वारंवार सभा घ्यावी लागत असेल तर त्यांचा पक्ष इथे कमकुवात आहे हे सिद्ध होतंय. या मतदारसंघात केवळ सुनील राऊतच निवडून येणार.

हे ही वाचा >> मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका

मोरारजी देसाई कोण होते?

मोरारजी देसाई हे बॉम्बे स्टेटचे (महाराष्ट्र व गुजरात) दुसरे मुख्यमंत्री होते. तसेच भारताचे पंतप्रधान होणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते अशी त्यांची ओळख आहे. देसाई बॉम्बेचे मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा टोकाचा विरोध होता. तसेच मुंबई महाराष्ट्राला देण्यासही त्यांनी विरोध केला होता.

Story img Loader