Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमधली ही लढत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपाला झुकतं माप मिळालं असलं, तरी राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सीचा फायदा भाजपाला होतो की काँग्रेस सत्ता राखते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Rajasthan Assembly Election Result 2023 Updates: राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भातले सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर!
भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
राजस्थानमध्ये भाजपानं २०० पैकी १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
राजस्थानच्या राजकारणात काँग्रेससाठी क्रमांक दोनचे महत्त्वाचे नेते सचिन पायलट त्यांच्या टाँक मतदारसंघात पिछाडीवर पडले आहेत.
राजस्थानमध्ये आपल्याला १०० टक्के विजयाची खात्री असून निकालाच्या दुसऱ्या दिवशी विजयी उमेदवारांची एक बैठकही मी बोलावली आहे – अशोक गेहलोत, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री
https://twitter.com/Politics_2022_/status/1730994632182677987
भाजपासाठी “बल्ले बल्ले” परिस्थिती – जयवीर शेरगिल, भाजपा नेते
“काँग्रेसनं गेल्या पाच वर्षांत लोकांना लुटलं आहे. फसवलं आहे. खोटी आश्वासनं दिली आहेत. त्यामुळेच लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल”, राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशींचा विश्वास
राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा पिछाडीवर…
निवडणूक आयोगाकडून पहिली अधिकृत आकडेवारी जाहीर!
राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयाचा दावा पक्षाचे अनेक नेते, खासदार व वरीष्ठ करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपानं सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यावर पक्षाचे कोटा नॉर्थमधील उमेदवार प्रल्हाद गुंजाल यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्याकडे वसुंधरा राजेंसारखं ज्येष्ठ नेतृत्व आहे. आम्हाला बाहेरून मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार आणण्याची गरज नाही”, अस गुंजाल म्हणाले आहेत.
राजस्थानमध्ये गेल्या ३० वर्षांत कोणत्याही एका पक्षाला सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. यंदा ती परंपरा मोडेल, असा विश्वास विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, एग्झिट पोल्समध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये भाजपानं पुन्हा आघाडी घेतली असून आता भाजपा ९० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे.
मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात काँग्रेसनं भाजपावर काहीशी आघाडी घेतली आहे.
काँग्रेस – ४९
भाजपा – ४५
इतर – २
दिल्ली भाजपा मुख्यालयात मिठाईची तयारी!
पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने.. काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर, भाजपा १०!
आमच्या विकासकामांमुळे, वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे आमचा विजय राजस्थानमध्ये निश्चित आहे. आमच्या जाहीरनाम्यावर जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे. तरुणांसाठी रोजगार, गॅस सिलेंडर, ५० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा, गृहलक्ष्मी योजना या सगळ्या योजना तरुणांना आणि युवकांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. इथे भाजपाचं काम नव्हतं. मोदीजी इथे येऊन अशा गोष्टी बोलायचे ज्या कदाचित देशाच्या पंतप्रधानांना शोभत नव्हत्या. १० वर्षं पंतप्रधान असूनही त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नव्हतं. इथले भाजपाचे नेते पूर्णपणे अपयशी होते – राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा
काँग्रेसचे मंत्री बी. डी. कल्ला यांना विजयाचा विश्वास, म्हणाले, “बिकानेरमधून मी निवडून विधानसभेत जाणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार!”
काँग्रेस कार्यकर्त्यांची मतमोजणीच्या आधी दिल्ली कार्यालयात पूजा-अर्चा
#WATCH | Ahead of the counting of 4-state elections, a Congress worker – dressed as Lord Hanuman – stands outside the party HQ in Delhi.
— ANI (@ANI) December 3, 2023
He says, "Truth will triumph. Jai Sri Ram!" pic.twitter.com/L61e28tBln
VIDEO | Congress leaders and workers worship at party headquarters in Delhi ahead of the counting of votes in four states today. pic.twitter.com/n4LRxEQ6OH
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2023
कल्याणकारी योजना आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचे आश्वासन हे या जाहीरनाम्याचे वैशिष्टय़ आहे. शेतकरी आणि युवकांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. तरुणांसाठी १० लाख नोकऱ्या, तसेच पंचायत स्तरावर नोकरभरतीसाठी नवीन योजना राबवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मोफत स्कुटी, अँटी-रोमियो स्क्वॉड, पोलिस दलात ३३ टक्के आरक्षण; भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
गेल्या तीन दशकांत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झालेली आहे. असे असले तरी या तीन दशकांत अपक्ष उमेदवार तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेले आहेत.
राजस्थानमध्ये यंदा सर्वात कमी मतदान जोधपूरमधील अहोरे मतदारसंघात झालं. २०१८मध्ये या मतदारसंघात ६१.८९ टक्के मतदान झालं होतं. यंदा तो आकडा ६१.२४ टक्क्यांपर्यंत खाली आला.
राज्यात सर्वाधिक मतदान अनुसूचित जमातींसाठी राखीव असणाऱ्या कुशलगढ मतदारसंघात झालं. इथे २०१८मध्येय ८६.४९ टक्के मतदान झालं होतं. २०२३मध्ये हाच आकडा ८८.१३ टक्के इतका वाढला आहे.
राजस्थानमध्ये २०० जागांसाठी यंदा ७४.९६ टक्के मतदान झालं. २०१८ च्या निवडणुकीत हाच आकडा ७४.०६ टक्के इतका होता.
आमच्या विकासकामांमुळे, वरीष्ठ नेत्यांनी केलेल्या प्रचारसभांमुळे आमचा विजय राजस्थानमध्ये निश्चित आहे. आमच्या जाहीरनाम्यावर जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे. तरुणांसाठी रोजगार, गॅस सिलेंडर, ५० लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा, गृहलक्ष्मी योजना या सगळ्या योजना तरुणांना आणि युवकांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. इथे भाजपाचं काम नव्हतं. मोदीजी इथे येऊन अशा गोष्टी बोलायचे ज्या कदाचित देशाच्या पंतप्रधानांना शोभत नव्हत्या. १० वर्षं पंतप्रधान असूनही त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नव्हतं. इथले भाजपाचे नेते पूर्णपणे अपयशी होते – राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा
पाहा मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष…
लोकसत्ता डॉट कॉमच्या वेबसाईटबरोबरच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही राजस्थान विधानसभेचा निकाल वाचकांना पाहाता येईल. तो कसा पाहावा? यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
काय होते राजस्थानमधील एग्झिट पोल्सचे अंदाज?
राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? काय सांगतायत एग्झिट पोल?https://t.co/FUawdQaetu << येथे वाचा सविस्तर वृत्त #exitpoll2023 #rajasthan #assemblyelection #election2023 pic.twitter.com/q7BzyPnih1
— LoksattaLive (@LoksattaLive) November 30, 2023
अंतर्गत दुफळींमुळे राजस्थानातील निवडणूक अधिक चुरशीची (संग्रहित छायाचित्र)
Rajasthan Assembly Election Result 2023 Updates: राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसला हात की भाजपाला मतदारांची साथ?