लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवारांच्या रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशीच एक लढत धाराशिवमध्ये (उस्मानाबाद लोकसभा) होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना धाराशिवमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपासून आमदार राणाजगजीतसिंह पाटलांवर वेगवेगळे आरोप करत आहेत तर राणा पाटील त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. धाराशिवमध्ये ही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी नवी मुंबईतल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयावरून राणा पाटलांवर आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना राणा पाटील म्हणाले, ओमराजेंनी आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन.

धाराशिवमधील प्रचारसभेत ओमराजे निंबाळकर म्हणाले होते, १९८३ साली सरकारने धाराशिवसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं होतं. परंतु, त्यांनी (राणा जगजीतसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांनी) ते नवी मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणी नेलं. नेरूळ हा काय आदिवासी भाग आहे का? धाराशिवचे लोक यांच्यासाठी मतदान करणार, दवाखान्याची आवश्यकता धाराशिवच्या लोकांना, धाराशिवमधील शेतकऱ्यांचा मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची आवश्यकता, पण यांनी (पाटील कुटुंब) ते नेरुळला नेलं. ही आपल्या मतदारसंघाची मोठी शोकांतिका आहे. यांनी ते वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नेरुळला नेलं ते नेलं वर त्यांनी ते स्वतःच्या संस्थेच्या मालकीचं केलं. यांनी स्वतःची एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट काढली आणि ते महाविद्यालय आता या ट्रस्टच्या मालकीचं आहे. मी राणा पाटलांना जाहीर आव्हान देतो की, त्यांनी १९८३-८४ नंतर २०२४ पर्यंत धाराशिवमधील एका तरी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला त्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देऊन डॉक्टर केलं आहे का ते सांगावं. असा एक तरी डॉक्टर त्यांनी दाखवावा. मी ठामपणे सांगतो की, त्यांनी असा एकही डॉक्टर घडवलेला नाही.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हे ही वाचा >> “२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांचा नवा गौप्यस्फोट; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या या आरोपांवर राणा जगजीतसिंह पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले, आमचा प्रतिस्पर्धी हा खोटारडा माणूस आहे. त्यांचं खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी करणं चालू असतं. परंतु, ती बोलबच्चनगिरी आता खपवून घेतली जाणार नाही. हा विरोधक खोटारडा आहे. तो म्हणे इथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं होतं ते आम्ही दुसरीकडे नेलं. असं झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो. तो माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. त्यापेक्षा जास्त काय बोलायचं? एकतर त्याला काही समजत नसेल किंवा तो खोटं बोलत असेल.

Story img Loader