लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवारांच्या रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशीच एक लढत धाराशिवमध्ये (उस्मानाबाद लोकसभा) होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना धाराशिवमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपासून आमदार राणाजगजीतसिंह पाटलांवर वेगवेगळे आरोप करत आहेत तर राणा पाटील त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. धाराशिवमध्ये ही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी नवी मुंबईतल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयावरून राणा पाटलांवर आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना राणा पाटील म्हणाले, ओमराजेंनी आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा