काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, सिल्लोडमध्ये जर महायुतीधर्म पाळला गेला नाही तर, मी महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांना दिला होता. त्यानंतर आता रावसाहेब यांनीही सत्तार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी स्वत:ची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना अब्दुल सत्तार यांच्या इशाऱ्यााबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “अब्दुल सत्तार काय बोलतात ते सोडा, औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता? मी शिवाजी आहे, आणि तो (अब्दुल सत्तार ) औरंगजेब आहे”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

हेही वाचा – Raosaheb Danve : महायुतीत धुसफूस? “मी चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत”, रावसाहेब दानवेंचा इशारा; खोतकरांनीही सुनावलं, म्हणाले, “आज तुम्ही…”

अब्दुल सत्तारांनी दिली प्रतिक्रिया

रावसाहेब दानवेंच्या या विधानावर अब्दुल सत्तार यांनीही भाष्य केलं. “रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. अशा चिल्लर व्यक्तीबद्दल बोलण्यात मला रस नाही. शिवाजी महाराज हे राज्याचे नाही, संपूर्ण देशाचा अभिमान आहे. अशा आपल्या राजांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्यांचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अमोल मिटकरींची रावसाहेब दानवेंवर टीका

दरम्यान, यावरून विधानवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावसाहेब दानवेंना लक्ष केलं. “रावसाहेब दानवे यांना आमची विनंती आहे की त्यांनी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांशी करताना आपलं तोंड आरशात बघावं. आपण बोलताना कोणाशी तुलना करतो, याची राजकीय अक्कल त्यांना असली पाहिजे. मी एक शिवप्रेमी म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी”, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा – नाशिक : एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय प्रदेशाध्यक्षांवर अवलंबून, रावसाहेब दानवे यांची भूमिका

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही केलं दानवेंना लक्ष्य

याशिवाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्र सोडलं. “अजून किती अपमान कराल आमच्या शिवाजी महाराजांचा? आता ही जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”, असे म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve abdul sattar aurangzeb and chhatrapati shivaji maharaj amol mitakari spb