नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या या मंत्रीमंडळात जेडीएसचे खासदार एचडी कुमारस्वामी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा यांचे काका आहेत. या निवडणुकीत जेडीएसचे केवळ दोन खासदार निवडून आले आहेत.

हेही वाचा – Video: इथे पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!…

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Chhagan Bhujbal And Manikrao Kokate.
Chhagan Bhujbal : “मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…”, छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्याचे भाष्य

प्रज्ज्वल रेवण्णा हे सुद्धा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी त्यांच्या कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राईव्ह बाहेर काढण्यात आला होता. कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

हे प्रकरण प्रकरण देशभरात पसरल्यानंतर कर्नाटक सरकारने याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. तसेच त्याच्या विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. इतकंच नाही, तर एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णावर जर्मनीमध्ये असल्याचे पुढे आले होतं.

हेही वाचा – Live: रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

दरम्यान, काही दिवसांनंतरच आपण भारतात परतणार असून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याचा व्हिडीओ रेवण्णाने प्रसिद्ध केला होता. त्यानुसार ३१ मे रोजी तो बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी पोलिसांनी त्याला विमानतळावरूनच अटक केली होती. प्रज्वल रेवण्णा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एचडी कुमारस्वामी कोण आहेत?

या निवडणुकीत जेडीएसचे केवळ दोन खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी एक एचडी कुमारस्वामी आहेत. ते कर्नाटकमधील मंड्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते दोन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. भाजपाने आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे.

Story img Loader