Rebel independent candidates Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. तर मविआत शिवसेनेने (ठाकरे) २०, काँग्रेसने १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवघ्या १० जागा जिंकल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यांतर अनेक मतदानोत्तर चाचण्यांमधून असे अंदाज वर्तवण्यात आले होते राज्यात महाविकास आघाडी व महायुतीत अटीतटीची स्पर्धा होईल, काही पोल्समधून अंदाज वर्तवण्यात आला होता की राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. अशा वेळी अपक्ष आमदार व इतर छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
अनेक मतदानोत्तर चाचण्यांमधून अंदाज वर्तवण्यात आला होता की राज्यात अपक्ष व लहान पक्षांचे २० ते ३० आमदार निवडून येतील. मात्र राज्यात केवळ दोन अपक्ष आमदार निवडून आले आहेत. राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल असं बोललं जात होतं. मात्र, राज्यातील जनतेने अपक्ष उमेदवारांपेक्षा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर विश्वास दर्शवला.
हे ही वाचा >> Video: लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’!
विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागावाटप, तिकीटवाटप चालू असताना अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांनी बंडाचं निशाण फडकावलं. अनेकांनी त्यांचा पक्ष, महायुती व महाविकास आघाडीविरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीच्या दोन-दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील झाल्या. राज्यभरात एकट्या भाजपाच्या १५ हून अधिक बंडखोरांनी निवडणूक लढवली. इतरही अनेक पक्षांच्या बंडखोरांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना जनतेने नाकारलं.
अपक्ष उमेदवारांपैकी किती जण जिंकले?
क्र. | मतदारसंघ | बंडखोर उमेदवार (पक्ष) | निवडणुकीचा निकाल |
1 | नांदगाव | समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार) | पराभूत |
2 | अक्कलकुवा | हिना गावित (भाजपा) | पराभूत |
3 | कसबा | कमल व्यवहारे (काँग्रेस) | पराभूत |
4 | पर्वती | आबा बागुल (काँग्रेस) | पराभूत |
5 | कोपरी – पाचपाखाडी | मनोज शिंदे (काँग्रेस) | पराभूत |
6 | कारंजा | ययाती नाईक | पराभूत |
7 | शिवाजीनगर | मनीष आनंद (काँग्रेस) | पराभूत |
8 | इंदापूर | प्रवीण माने, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी) | पराभूत |
9 | पुरंदर | दिगंबर दुर्गडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) | पराभूत |
10 | मावळ | बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) | पराभूत |
11 | जुन्नर | आशा बुचके – भाजप | पराभूत |
12 | खेड आळंदी | अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार | पराभूत |
13 | भोर | किरण दगडे पाटील, भाजप | पराभूत |
14 | मीरा रोड | गीता जैन | पराभूत |
15 | सिंदखेड राजा | गायत्री शिंगणे | पराभूत |
16 | बीड | ज्योती मेटे (रासप) | पराभूत |
17 | सोलापूर शहर मध्य | तौफिक शेख | पराभूत |
18 | श्रीवर्धन | राजा ठाकूर | पराभूत |
19 | सावनेर | अमोल देशमुख (काँग्रेस) | पराभूत |
20 | काटोल | याज्ञवल्क्य जिचकार | पराभूत |
21 | रामटेक | चंद्रपाल चौकसे | पराभूत |
22 | उमरेड | प्रमोद घरडे | पराभूत |
23 | नागपूर पश्चिम | नरेंद्र जिचकार | पराभूत |
24 | सोलापूर शहर उत्तर | शोभा बनशेट्टी | पराभूत |
25 | श्रीगोंदा | राहुल जगताप (सपा) | पराभूत |
26 | अहेरी | अबरीश अत्राम (भाजपा) | पराभूत |
27 | विक्रमगड | प्रकाश निकम | पराभूत |
28 | नाशिक मध्य | हेमलता पाटील | पराभूत |
29 | मावळ | बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार | पराभूत |
30 | जुन्नर | आशा बुचके, भाजप | पराभूत |
31 | जुन्नर | शरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट | विजयी |
32 | भोर | किरण दगडे पाटील, भाजप | पराभूत |
33 | शिवाजीनगर | मनीष आनंद | पराभूत |
34 | बडनेरा | प्रिती बंड | पराभूत |
35 | पुरंदर | संभाजी झेंडे | पराभूत |
36 | चंदगड | शिवाजी पाटील | विजयी |
राज्यात केवळ दोन अपक्ष उमेदवार जिंकले
चर्चेत असणाऱ्या ३६ बंडखोर उमेदवारांपैकी केवळ दोघांनाच विधानसभेची निवडणूक जिंकता आली. उर्वरित ३४ बंडखोर उमेदवार या निवडणुकीत पडले.