बंडखोर उमेदवारांना राज्यातील जनतेने नाकारलं. (PC : Loksatta)
Rebel independent candidates Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. तर मविआत शिवसेनेने (ठाकरे) २०, काँग्रेसने १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवघ्या १० जागा जिंकल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यांतर अनेक मतदानोत्तर चाचण्यांमधून असे अंदाज वर्तवण्यात आले होते राज्यात महाविकास आघाडी व महायुतीत अटीतटीची स्पर्धा होईल, काही पोल्समधून अंदाज वर्तवण्यात आला होता की राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. अशा वेळी अपक्ष आमदार व इतर छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
अनेक मतदानोत्तर चाचण्यांमधून अंदाज वर्तवण्यात आला होता की राज्यात अपक्ष व लहान पक्षांचे २० ते ३० आमदार निवडून येतील. मात्र राज्यात केवळ दोन अपक्ष आमदार निवडून आले आहेत. राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल असं बोललं जात होतं. मात्र, राज्यातील जनतेने अपक्ष उमेदवारांपेक्षा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर विश्वास दर्शवला.
विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागावाटप, तिकीटवाटप चालू असताना अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांनी बंडाचं निशाण फडकावलं. अनेकांनी त्यांचा पक्ष, महायुती व महाविकास आघाडीविरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीच्या दोन-दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील झाल्या. राज्यभरात एकट्या भाजपाच्या १५ हून अधिक बंडखोरांनी निवडणूक लढवली. इतरही अनेक पक्षांच्या बंडखोरांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना जनतेने नाकारलं.
चर्चेत असणाऱ्या ३६ बंडखोर उमेदवारांपैकी केवळ दोघांनाच विधानसभेची निवडणूक जिंकता आली. उर्वरित ३४ बंडखोर उमेदवार या निवडणुकीत पडले.