Sada Sarvankar vs Amit Thackeray in Mahim Assembly Constituency : मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने अमित ठाकरे यांना या मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. भाजपा नेते दादर-माहीममध्ये अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचं पक्षातील अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शिवसेनेने (शिंदे) येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीममधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपा व मनसेने दबाव निर्माण केला होता. मात्र, सरवणकरांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला नाही. आज (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, सरवणकरांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सदा सरवणकर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली, यावेळी ते म्हणाले, “राज ठाकरे यांना भेटण्यासाठी माझा मुलगा समाधान व आमचे इतर चार पदाधिकारी त्यांच्या घरी गेले होते. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. तसेच त्यांनी सांगितलं की माझे वडील देखील राज ठाकरे यांना भेटू इच्छितात. निवडणुकीबाबत चर्चा करू इच्छितात. त्यावर राज ठाकरे यांनी मला काही बोलायचं नाही, तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर घ्या, तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढा, असा संदेश पाठवला. त्यामुळे त्यांच्याशी पुढे कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. त्यांनी भेट देखील नाकारल्यामुळे मला आता निवडणूक लढवावीच लागेल”.

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या निर्णयाचा मला आनंद, कारण…”, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया!

सदा सरवणकर राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेचे (शिंदे) आमदार म्हणाले, राज ठाकरेंशी माझं बोलणं झालं नाही. त्यांनी भेटही नाकारली. त्यामुळे आता मला निवडणूक लढवणं… मला त्यांना भेटून विनंती करायची होती, मात्र त्यांनी भेटच नाकारल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करावं असा प्रश्न पडला आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला माझी इच्छा त्यांच्यापुढे बोलून दाखवायची होती. काही समीकरणं समजावून सांगायची होती. मात्र त्यांनी सांगितलं की त्यांना भेटायचं नाही. तुम्हाला निवडणूक लढायची असेल तर लढवा, निवडणुकीला उभं राहायचं असेल तर उभे राहा. त्यामुळे मला त्यांची भेटच मिळणार नसेल तर मला उमेदवार म्हणून काम करावं लागणार आहे. राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे मला निवडणूक लढवावी लागेल”.