Sanjay Raut : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुळामाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करतो आहेत. मनसेनेही काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने त्यांना दादर-माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दादर-माहीम हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरच आता शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना जर दादर-माहीममधून ठाकरे परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील, तर तरुणांचा राजकारणात स्वागत करावं, ही आमची परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra News Live : मविआत जागावाटपावरून वाद? उमेदवाऱ्या जाहीर करण्यास वेळ का लगतोय? राऊत म्हणाले…
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
वरळीमध्ये मनसेने उमेदवार दिला आहे. त्यांचा एक राजकीय पक्ष आहे. याशिवाय समाजवादी पक्ष, वंजित बहुजन आघाडी यांनीही उमेदवार दिले आहेत. भाजपाला मदत करण्यासाठी ज्याशक्ती निर्माण झाल्या आहेत, त्या उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष निवडणूक लढवूनही यश प्राप्त होत नाही, ते पक्षही निवडणूक लढण्याचे थांबत नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवू नये, असं आम्ही म्हणणार नाही. जर दादर-माहीममधून आमच्याच ठाकरे परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील, तर तरुणांचा राजकारणात स्वागत करावं, ही आमची परंपरा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
खरं तर २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा वरळीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यंदा अमित ठाकरेंविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार देणार का? असा स्पष्ट प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला.याबाबत बोलताना, दादर-माहीम मतदारसंघात शिवसेना कायम लढत आली आहे. याच मतदारसंघात या शिवसेनेची स्थापन झाली. त्यामुळे इथे शिवसेना लढणार नाही, असं होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, वरळीतून मनसेचे माघार घेतली, तर शिवसेना उमेदवार देणार नाही, असं होऊ शकतं का? असं विचारलं असता, शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. राजकारणात क्वचितच अशा गोष्टी घडत असतात. वरळीतून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. वरळीतील जनतेने आदित्य ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकांसाठी धावणारा आमचा तरुण नेता आहे. त्यामुळे आम्हाला वरळीची चिंता नाही, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी
मंगळवारी रात्री मनसेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मनसेने वरळीतून संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे यांची थेट लढत संदीप देशपांडे यांच्याशी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.