शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल. तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार जाऊन त्याजागी इंडिया आघाडीचं सरकार येईल. तसेच भाजपाप्रणित एनडीएला २०० जागादेखील मिळणार नाहीत.” त्याचबरोबर राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, ज्या ईडी, सीबीआय आणि आयटीसारख्या संस्थांचा वापर करून हे लोक विरोधकांना तुरुंगात डांबत आहेत. याच संस्था मोदी आणि शाहांची देखील वाट पाहत आहेत. सत्ताबदल झाल्यावर यांनादेखील तुरुंगात जावं लागू शकतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन महिने तुरुंगात होते, ते आता जामीनावर बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील तुरुंगात जावं लागू शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची इच्छा असेल तर उद्धव ठाकरेंना तुरुंगात जावं लागू शकतं. परंतु, मोदी आणि शाह यांची बाजू न्यायाची नाही.

संजय राऊत म्हणाले, मोदी आणि शाहांच्या इच्छेनुसार कोणालाही तुरुंगात जावं लागू शकतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. भविष्यात त्या दोघांनाही तुरुंगात जावं लागू शकतं. जो खेळ त्यांनी सुरू केलाय तोच खेळ त्यांच्यावरही उलटू शकतो. कारण हा देश काही कोणाच्या मालकीचा नाही. या देशात कधीही सत्ताबदल होईल आणि तुम्ही जे गुन्हे करून ठेवले आहेत. त्यासाठी तुम्हाला कधी तुरुंगात जावं लागेल हे सांगता येत नाही. जे कायदे आणि संस्था वापरून तुम्ही आज विरोधकांना त्रास देत सुटलेले आहात तेच कायदे, त्याच संस्था आणि तेच तुरुंग तुमची देखील वाट पाहत आहेत.

हे ही वाचा >> मोदींनी वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज; गंगा पूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेत झाले भावूक

संजय राऊत म्हणाले, स्वतः नरेंद्र मोदी यांना देखील खात्री नाही की ते परत निवडणूक जिंकतील. त्यांचा चेहरा बघा कसा काळा ठिक्कर पडलाय. अमित शाहांचा चेहरा बघा, त्यांची दाढी जळल्यासारखी वाटते. घाबरलेला माणूस थोडाफार आत्मविश्वास दाखवतो. तसाच आत्मविश्वास भाजपा दाखवतेय. एकनाथ शिंदेंचं उदाहरण घ्या, आमचीच शिवसेना खरी असं ते सांगत फिरतायत. मात्र शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे गोधडीत झोपले होते, रांगत होते. आज हाच खोटारडा माणूस रेटून आणि आत्मविश्वासाने बोलतोय की शिवसेना आमचीच… हा खोटं बोलण्याचा आत्मविश्वास कुठून आला तर गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी निर्माण केला. एकनाथ शिंदे हा भाजपाने निर्माण केलेला एक बुडबुडा आहे. मी जर म्हणालो की ही मोदी आणि शाहांची भाजपा खोटी आहे, लालकृष्ण अडवाणींची भाजपा खरी, अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा खरी तर चालेल का?