महायुतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावरून निर्माण झालेला तिढा सोडवला आहे. महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीने मिळवली असून या जागेवर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. युतीत गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा शिवसेना लढवत आली आहे. मात्र यंदा ही जागा भाजपाला सुटली आहे. संयुक्त शिवसेनेचे विनायक राऊत हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नव्हता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले खरे, मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा