Satara Assembly Constituency: साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात कोण? शरद पवारांच्या रणनीतीकडे लक्ष

Satara Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी असलेला सातारा विधानसभा हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे.

Satara Assembly Constituency Maharashtra Assembly Election
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसलेंच्या विरोधात उमेदवार कोण? (Photo – Loksatta Graphics)

Satara Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या खालोखाल काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर महायुतीचे जिल्ह्यातील प्रस्थ वाढले आहे. राष्ट्रवादीकडे असलेला सातारा विधानसभा भाजपाकडे तर वाई मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात आहेत. २०१९ च्या आधी सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. यावर्षी शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात कोणता उमेदवार पुढे केला जाणार याबद्द उत्सुकता आहे.

सातारा विधानसभेचा राजकीय इतिहास

सातारा विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसच्या ताब्यात होता. १९६२ ते १९७२ पर्यंत धोंडीराम जगताप काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत होते. १९७८ साली अभयसिंह राजे भोसले (शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील) यांनी जनता पक्षाच्या तिकीटावर येथे विजय मिळविला. त्यानंतर १९८० पासून ते १९९५ पर्यंत ते लागोपाठ चार वेळा याठिकाणी निवडून येत होते. १९९८ साली पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या तिकीटावर याठिकाणी विजय मिळविला. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत अभयराजे भोसले यांचे पुनरागमन झाले. तर त्यानंतर २००४ पासून शिवेंद्रराजे भोसले याठिकाणी जिंकून येत आहेत.

हे वाचा >> Patan Assembly Constituency: पाटण विधानसभेमध्ये देसाई की पाटणकर? मविआकडून उमेदवार कोण?

शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभेचे आमदार झाल्यापासून त्यांच्या तोडीस तोड उमेदवार याठिकाणी इतर पक्षांना लाभलेला नाही. भाजपाचे दीपक पवार हे त्यांना झुंज देत होते. मात्र स्वतः शिवेंद्रराजे भोसलेच भाजपावासी झाल्यामुळे दीपक पवार यांनी २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. दीपक पवार यांना राष्ट्रवादीने शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उभे केले. दीपक पवार यांना २०१४ पेक्षा जास्त मते मिळाली. मात्र तरीही त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला.

हे ही वाचा >> Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

२०१९ च्या विधानसभेचा निकाल

१) शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – १,१८,००५

२) दीपक पवार (राष्ट्रवादी) – ७४,५८१

३) अशोक गोरखनाथ दीक्षित (वंचित) – ३१५३

२०१४ च्या विधानसभेचा निकाल

१) शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – ९७,९६४

२) दीपक पवार (भाजपा) – ५०,१५१

३) दगडू सकपाळ (शिवसेना) – २५,४२१

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satara assembly constituency maharashtra assembly election who will contest against bjp mla shivendra raje bhosale kvg

First published on: 11-10-2024 at 17:07 IST
Show comments