महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या शिवालयमध्ये झालेल्या मविआ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मविआत कोणतेही मतभेद नसल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. तसेच, यावेळी तिन्ही पक्षांना कोणत्या जागा मिळाल्या आहेत याची यादीही जाहीर करण्यात आली. या यादीद्वारे सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सांगलीतून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील प्रयत्न करत होते. पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम पाटलांच्या समर्थनात मैदानात उतरले होते. दोन्ही नेत्यांनी दोन वेळा दिल्लीवारी करून काँग्रेस पक्षश्रेंष्ठींची भेटही घेतली होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाने सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते कोणता निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या विचारांत असल्याचीदेखील चर्चा रंगत आहे.
Premium
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
विशाल पाटील यांच्या आजींनी म्हणजेच दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी नातवाचे कान टोचले आहेत.
Written by अक्षय चोरगे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-04-2024 at 23:01 IST
TOPICSभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congressलोकसत्ता प्रीमियमPremium Loksattaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionशिवसेनाShiv SenaसांगलीSangli
+ 1 More
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalini patil slams grandson vishal patil no point in contesting independent elections sangli loksabha asc