Sharad Pawar Baramati speech on NCP Dispute : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून १५ महिने उलटले आहेत. गेल्या १५ महिन्यांपासून पक्षाचे दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सहकारी थेट शरद पवारांवर टीका करताना दिसतात. शरद पवारांनी प्रत्येक वेळी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं नाही. मात्र, आज (२९ ऑक्टोबर) बारामतीमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय घडलं, यावर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकारने चक्रं फिरवून आमचा पक्ष त्या गटाला दिला. मात्र जनता आमच्याबरोबरच आहे”.

शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी काढला? आपण काढला. निवडणूक चिन्ह कोणाचं? आपलं. परंतु, एके दिवशी काही लोकांनी थेट आमच्यावर खटला दाखल केला. मी माझ्या आयुष्यात कधी न्यायालयासमोर उभा राहिलो नव्हतो. परंतु, काही लोकांनी आमच्यावर खटला दाखल करून आम्हाला न्यायालयासमोर उभं केलं. ते म्हणाले, या पक्षाचे मालक आम्ही आहोत. ते निवडणूक चिन्ह देखील त्यांचं नाही आमचं आहे, असं ते म्हणाले. दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. ज्यांनी खटला दाखल केला त्यांनी प्रमुख आरोपी म्हणून माझं नाव दिलं होतं. या प्रकरणात माझ्यावर खटला दाखल करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने मला समन्स पाठवलं. समन्सवर शरद गोविंदराव पवार असं नाव होतं”.

Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar big statement on RR Patil Tasgaon Assembly Election
Ajit Pawar on RR Patil: “आर. आर. पाटलांनी माझा केसानं गळा कापला, फडणवीसांनी मला…”, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, “समन्स आल्यावर मी पहिल्यांदाच न्यायालयासमोर हजर झालो. यापूर्वी निवडणूक आयोगाने देखील समन्स धाडलं होतं. निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांनी आपल्याला समन्स धाडलं असेल तर आपल्याला त्यांच्यासमोर चौकशीला उभं राहावं लागतं. मी न्यायालयात गेलो. न्यायमूर्तींसमोर उभा राहिलो. दिवस-दिवसभर खटला चालत होता. मला दिवसभर तिथे उभं करण्याचं काम त्या लोकांनी केलं. मी ही न्यायालयासमोर उभा राहिलो. तक्रार माझ्याविरोधात होती, तक्रार कोणाची होती? तक्रार चिरंजीवांची होती. न्यायालयाने पाहिलं दोन्ही बाजूची नावं सारखीच आहेत. दोन्ही पवारच आहेत”.

हे ही वाचा >> ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार

…पण आम्ही हार मानली नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणाले, “माझ्या आयुष्यात असं कधी घडलं नव्हतं. पण त्यांनी तो खटला दाखल करून मला कोर्टात खेचलं होतं. महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार त्यांच्या हातात होतं. त्या सरकारने काय चक्रं फिरवली मला माहित नाही. न्यायालयाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह त्या दुसऱ्या गटाचं आहे. शरद पवारांचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला नवं निवडणूक चिन्ह घ्यावं लागलं. पक्षाचं नाव बदलावं लागलं. त्यांनी आपला पक्ष आणि पक्षाचं चिन्ह पळवलं. ते लोक एवढं करून थांबले नाहीत. त्यांनी अजूनही त्रास दिला. परंतु, आपणही हार मानली नाही”.

Story img Loader