लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. आज शरद पवार यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला. “अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही”, असा थेट इशारा शरद पवार यांनी थेट नाव न घेता दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पवार काय म्हणाले?

“ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. देशाची सत्ता भाजपाकडे आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले, त्यामुळे समाजातील मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे. त्यामुळे या संपूर्ण देशाचे राजकारण योग्य ट्रॅकवर कसे आणता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना आम्ही एकत्र आणले आहे. इंडिया आघाडी तयार केली. यानंतर देशातील परिस्थिती बदलायला लागली आहे. आज केरळ, तामिळनाडू, आध्र प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसामध्ये भाजपाची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे देशाचा कारभार योग्य पद्धतीने करायचा असेल तर भाजपाचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

हेही वाचा : “अजित पवार हे जाणीवपूर्वक विसरलेत की…”, बंधू राजेंद्र पवारांनी मांडली भूमिका; म्हणाले, “कर्जत-जामखेडला रोहितसाठी…”

“महाराष्ट्रामध्ये काही पक्ष आहेत. आपल्या भागातही काही पक्ष आहेत. त्या पक्षाचे कुठे दमदाटी करणे, कुठे पाणी देणार नाही म्हणणे, कुठे नोकरी देणार नाही म्हणणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एक प्रकारे लोकांना दमदाटी करून त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरत आहे. या दौऱ्यात मला एक दिसते की, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे. तो बदल भाजपाला सत्तेतून दूर करणे हाच होय”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

दत्तात्रय भरणे यांना इशारा

“इंदापूरमधील काही लोकांची आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय केले नाही. दुकानात मदत पाहिजे, त्यामध्ये मदत केली. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. आज मी एवढे सांगतो की, कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही”, असा इशारा शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत बोलताना दिला.