कोल्हापूरमध्ये मोदींची सभा पार पडली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यानंतर मोदींनी आणि भाजपाने कोल्हापूरच्या गादीचा मान ठेवायला हवा होता अशी चर्चा रंगली. त्यावरुन विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केलं. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याची गादी महत्त्वाची नाही का? असा सवाल विरोधकांना केला आहे. आज शरद पवार यांनी भाषणात मोदींना कोल्हापूरमधून थेट इशाराच दिला आहे. ज्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

शाहू महाराजांना निवडून देण्याचं आवाहन

कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज गांधी शिव शाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बडे नेतेही कोल्हापुरात उपस्थित होते. मोदींनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सभा घेतली. त्यानंतर,आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन शाहू महाराजांना निवडून देण्याचं आवाहन कोल्हापूरकरांना केलं आहे. आज १ मे अर्थात महाराष्ट्र दिन असल्याने शरद पवारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगत भाषणाला सुरुवात केली.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Rohit Pawar On Salil Deshmukh Nagpur Ajit Pawar
Rohit Pawar : शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट; पडद्यामागे काय घडतंय? रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार…”
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
What Sharad Pawar Said About Chhagan Bhujbal ?
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”

हे पण वाचा- शरद पवारांचा हल्लाबोल, “धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस, मी जर बोललो तर..

काय म्हणाले शरद पवार?

“इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, राज्यांमधल्या अनेक भागात त्या जात असत. देशातल्या गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची हा विचार मांडत असत. देशातल्या सगळ्यात पंतप्रधानांनी हे काम केलं आहे. आत्ताचे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात आले की त्यांना दोन लोकांची आठवण होते. एक उद्धव ठाकरे दुसरे शरद पवार. आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. तुम्ही महाराष्ट्रात कितीही आलात, कितीही टीका केलीत तरीही जेव्हा संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमची ती तयारी आहे.” असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट इशाराच दिला आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, “महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो आहे, कारण..”

सतेज पाटील यांचं वक्तव्यही चर्चेत

याच प्रचारसभेत सतेज पाटील म्हणाले, “आम्ही टी-20 खेळत असून आता शेवटच्या ओव्हर बाकी आहेत, आपला स्कोअर चांगला झाला आहे. आता राहिलेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी. फुले, शाहू आंबेडकरांचा आवाज धुमधडाक्यात पोहोचला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र कोल्हापूरकडे पाहत आहे.”

Story img Loader