राष्ट्रवादीतील फुटलेला गट, अजित पवारांची भूमिका, पंतप्रधान मोदींकडून केली जाणारी वैयक्तिक टीका, लोकसभेचं आव्हान, इंडिया आघाडीतील पंतप्रधानपदाचा चेहरा, कृषी धोरण अशा विविध विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये सविस्तर भूमिका मांडली.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी विविध मुद्द्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं दिली आहेत.