India Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Updates, 13 May: देशभरात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असून महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून समोरच्या उमदवाराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. त्यातच शरदचंद्र पवार गटाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओसह केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा दावा केला आहे.

देशभर चौथ्या टप्प्यात एकूण १० राज्यांमधल्या ९६ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का कमी राहिल्याचं दिसून आलं आहे. चौथ्या टप्प्यात मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानुसार आज सकाळी ७ वाजता ९६ मतदारसंघांमध्ये सर्व मतदानकेंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटानं एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनीही हे व्हिडीओ शेअर करत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. “हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांच्या वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा की विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?” असा सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

शरद पवार गटानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही कार्यकर्ते भांडत असल्याचं दिसत आहे. हे रात्रीचे व्हिडीओ असून त्यात रस्त्यावर रोख रकमेची बंडलं पडल्याचंही दिसत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांशी हुज्जत घालत असून त्यात भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचीही नावं घेतली जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शरद पवार गटानं या व्हिडीओंच्या चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात आता निवडणूक आयोगाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याची चर्चा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

काय आहे शरद पवार गटाच्या पोस्टमध्ये?

शरद पवार गटाकडून या पोस्टमध्ये भाजपाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचं नाव घेण्यात आलं आहे. “बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रातही भाजपाने केली. पण या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

अजित पवारांना धक्का! वेल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बारामतीमधील ‘ते’ व्हिडीओ!

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्रीचे काही व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केले होते. या व्हिडीओंमध्ये बारामतीमधील एक बँक मध्यरात्रीही चालू असल्याचं दिसून आलं होतं. त्यावेळीही शरद पवार गटाकडून पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता.