Sharad Pawar NCP In Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक लढवली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हाशी साम्य असलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हाचा फटका बसल्याचं बोललं जात होतं. शरद पावारांच्या पक्षाचे उमेदवार ज्या मतदारसंघात उभे होते, तिथे काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह असलेल्या अनेक अपक्षांना हजारो-लाखो मतं मिळाली होती. यामुळे शरद पवारांचा साताऱ्यातील शिलेदार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं राष्ट्रवादीमधील (शरद पवार) नेत्यांचं म्हणणं होतं. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र, आयोगाने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.
पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. तसेच या चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. दरम्यान, या पक्षाने आता ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी देखील होती. होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक अपक्ष उमेदवारांना व लहान पक्षांच्या उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. या उमेदवारांनी हजारो मतं देखील मिळवली. जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा मतदासंघात शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाला, त्यापेक्षा अधिक मतं पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत. या मतांचं विभाजन झालन नसतं तर कदाचित शरद पवारांच्या पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते, असं मत या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
कमी मतफरकाने पराभूत झालेले शरद पवारंचे शिलेदार
क्र | मतदारसंघ | विजयी उमेदवार व त्याला मिळालेली मतं | राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार व त्याला मिळालेली मतं | विजयी उमेदवाराचं मताधिक्य | अपक्ष उमेदवार व त्याला मिळालेली मतं (निवडणूक चिन्ह पिपाणी ) |
1 | शहापूर | दौलत दरोडा – ७३,०८१ | पांडुरंग बरोरा – ७१,४०९ | १८७२ | रमा शेंडे – ३,८९२ |
2 | बेलापूर | मंदा म्हात्रे – ९१,८५२ | संदीप नाईक – ९१,४७५ | ३७७ | प्रफुल्ल म्हात्रे – १,८६० |
3 | अणुशक्ती नगर | सना मलिक – ४९,३४१ | फहाद अहमद – ४५,९६३ | ३३७८ | जयप्रकाश अगरवाल – ४,०७५ |
4 | जिंतूर | मेघना बोर्डीकर – १,१३,४३ | विजय भांबळे – १,०८,९१६ | ४,५१६ | विनोद भावळे – ७,४३० |
5 | घनसावंगी | हिकमत उधाण – ९८,४९६ | राजेश टोपे – ९६,१८७ | २,३०९ | बाबासाहेब शेळके – ४,८३० |
6 | आंबेगाव | दिलीप वळसे पाटील – १,०६,८८ | देवदत्त निकम – १,०५,३६५ | १,५२३ | देवदत्त शिवाजी निकम २,९६५ |
7 | परांडा | तानाजी सावंत – १,०३,२५४ | राहुल मोटे – १,०१,७४५ | १५०९ | जमील खानव – ४,४४६ |
8 | पारनेर | काशिनाथ म्हादू दाते – १,१३,६३० | राणी लंके – १,१२,१०४ | १,५२६ | सखाराम सरक – ३,५८२ |
9 | केज | नमिता मुंदडा – १,१७,०८१ | पृथ्वीराज साठे – १,१४,३९४ | २,६८७ | अशोक थोरात – ३,५५९ |
हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
सातारा लोकसभेतही नुकसान
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे ३२ हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात पिपाणी या निवडणूक चिन्हासह लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला ४७ हजार मतं मिळाली होती.