Sharad Pawar NCP In Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक लढवली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हाशी साम्य असलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हाचा फटका बसल्याचं बोललं जात होतं. शरद पावारांच्या पक्षाचे उमेदवार ज्या मतदारसंघात उभे होते, तिथे काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह असलेल्या अनेक अपक्षांना हजारो-लाखो मतं मिळाली होती. यामुळे शरद पवारांचा साताऱ्यातील शिलेदार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं राष्ट्रवादीमधील (शरद पवार) नेत्यांचं म्हणणं होतं. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र, आयोगाने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा